शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

ShivSena-Vanchit Alliance: कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार?, नेमकी स्थिती जाणून घ्या

By विश्वास पाटील | Updated: January 24, 2023 13:09 IST

विश्र्वास पाटील  कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात राज्यस्तरावर झालेल्या युतीचे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या मुख्यत: ...

विश्र्वास पाटील कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात राज्यस्तरावर झालेल्या युतीचे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या मुख्यत: नेत्यांतून स्वागत झाले. शिवसेनेचे तीन जिल्हाध्यक्ष आहेत व वंचितचे दोघे. त्यांच्यातील एकजूटच ही युती यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. वंचितने गेली लोकसभा व विधानसभेलाही उमेदवार रिंगणात उतरवले होते. पक्षात फूट पडून सगळे सोडून गेले असताना, नवी युती शिवसेनेला सामाजिक पाया विस्तृत करण्यासाठी उपयोगी ठरणारी आहे. लोकसभा, विधानसभेला युतीचा कितपत प्रभाव पडू शकेल, हे लक्षात येण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी जावा लागेल.दोन भिन्न विचारधारा असलेले हे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रित आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांत गाव, तालुका व जिल्हा पातळीवरही कधीच परस्पर संबंध नाहीत, उलट परस्परांच्या विरोधातच आंदोलन केल्याचा, संषर्घ केल्याचा इतिहास आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कोण, हे वंचितच्या जिल्हाध्यक्षांना माहीत असेल, परंतू वंचितचे जिल्हाध्यक्ष कोण, हे शिवसेनेला माहीत नाही इतके या दोन पक्षांत आजचे अंतर आहे. शिवसेनेचे तीन जिल्हाध्यक्ष सध्या आहेत. वंचितचे कोल्हापूर लोकसभेसाठी आमजाई व्हरवडे येथील दयानंद कांबळे, तर हातकणंगलेसाठी तेरवाडचे विलास कांबळे जिल्हाध्यक्ष आहेत. मुख्यत: प्रकाश आंबेडकर यांना मानणारा गावोगावचा कडवा कार्यकर्ता हाच वंचितचा पाया आहे. भगव्या झेंड्याला खांद्यावर घेऊन लढणारा गावोगावचा निष्ठावंत कार्यकर्ता ही शिवसेनेचीही ताकद आहे. त्यामुळे हे दोन घटक एकत्र आल्यास त्याचा मुख्यत: शिवसेनेला जास्त फायदा होऊ शकतो. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक म्हणून निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा लाभ या आघाडीला चांगला होऊ शकतो.वंचितने गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघात हवा केली. त्यांच्या उमेदवाराने लाखावर मतेही घेतली. परंतू ते उमेदवारच गेल्या काही महिन्यामध्ये शिवसेनेत आले आहेत. विधानसभेलाही चंदगड व हातकणंगलेमध्ये त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यात चंदगडला स्वत: अप्पी पाटील यांची ताकद होती. हातकणंगलेमध्ये मतदार संघ राखीव असल्याने नवबौध्द मतदारांचे प्रमाण जास्त आहे. त्याचाही फायदा त्यांना झाला. शिरोळमध्येही बऱ्यापैकी मते मिळाली आहेत. निवडणुकीनंतर शिवसेना लोकांचे प्रश्र्न मांडत आली आहे. त्या तुलनेत वंचित फारशी सक्रिय नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीतील वंचितचे उमेदवारलोकसभा :हातकणंगले- अस्लम सय्यद - १ लाख १० हजारकोल्हापूर - अरुणा माळी - ७८ हजार

विधानसभा :चंदगड - अप्पी पाटील - ४३८३९राधानगरी - जीवन पाटील - ७७६२कागल : उमेदवार नाहीकोल्हापूर दक्षिण- दिलीप कवडे - २१८५करवीर : डॉ. आनंदा गुरव - ४३६४उत्तर : राहुल राजहंस - ११३०शाहूवाडी - डॉ. सुनील पाटील - २८८१हातकणंगले - एस. आर. कांबळे - ११२०७इचलकरंजी - शशिकांत आमणे - ३६३३शिरोळ - सुनील खोत - ९५१६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी