शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

By Admin | Updated: June 6, 2014 01:40 IST2014-06-06T01:24:15+5:302014-06-06T01:40:55+5:30

समाजप्रबोधन कार्यक्रम : तालीम, संस्थांचा सहभाग

Shivrajyabhishek's ceremony is ready for the city | शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील विविध मंडळे, तालीम व संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. उद्या (दि. ६) शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने शहरात समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे अवघे शहर शिवमय झाले आहे.
संयुक्त शिवाजी पेठेतर्फे
शिवाजी पेठेतील संयुक्त शिवाजी पेठ व निवृत्ती तरुण मंडळातर्फे निवृत्ती चौक येथे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता प्रसाद वाटप, सायंकाळी चार वाजता ओम गणेश मर्दानी आखाडा (राजाराम चौक) यांच्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम, सात वाजता अलंकारनिर्मित ‘रसिक रंजन’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम. रात्री आतषबाजीने सांगता होणार आहे.
सामाजिक बांधीलकी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत (कै.) वस्ताद सुहास ठोंबरे यांच्या मुलींच्या नावे २५ हजार रुपयांची ठेवपावती ठेवली. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयांना पुस्तक भेट, राज्याभिषेक सोहळ्यातील खर्चात काटकसर करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार पेठ येथील अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालय येथून सायंकाळी ४.३० वाजता शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात समाजप्रबोधनात्मक फलक यांचा समावेश असणार आहे.
नाट्यरूपातून उलगडणार
शिवरायांचा जीवनप्रवास
महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव व्हावा, या उद्देशाने शिवरायांची यशोगाथा सांगणार्‍या ‘प्रभो शिवाजी राजा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. महालक्ष्मी मंदिराशेजारील संत गाडगे महाराज चौक येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे लेखन इंद्रजित सावंत यांनी केले. दिग्दर्शन स्वप्निल यादव यांचे, नृत्यदिग्दर्शन दीपक बिडकर, तर संगीत संयोजन प्रशांत देसाई यांचे आहे. प्रसंगानुरूप काही नृत्यांचा समावेश आहे. गीते प्रत्यक्ष रंगमंचावर वाद्यवृंद ‘संस्कार’ प्रस्तुत ‘जीवनगाणे’चे कलाकार सादर करतील. लाईट इफेक्टस व ध्वनिसंयोजन हेही वैशिष्ट्य आहे.
महाअभिषेक
महायुती आणि कोल्हापूर शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सकाळी १० वा. शिवाजी चौक येथे शिवप्रतिमेस महाअभिषेक करून शिवरायांची आरती करण्यात येणार आहे.
शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर व शिवगर्जना मर्दानी आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अपघाताने घेतले १२ हजार बळी!
वर्षभरातील चित्र : अपघात, जखमी व मृत यामध्ये राज्यात कोल्हापूर परिक्षेत्र अग्रेसर
कोल्हापूर : गेल्या वर्षभरात राज्यातील विविध भागांमध्ये ६१ हजार ८९० अपघात असून, यांमध्ये १२ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ हजार १०६ प्रवासी जखमी झाले आहेत़
सर्वाधिक अपघात केवळ मुंबई शहरात २३ हजार ५१२ इतके झाले आहेत. त्या खालोखाल नाशिक आणि कोल्हापूर परीक्षेत्रांचा क्रमांक लागतो. या अपघातांत मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत नाशिक परीक्षेत्र आघाडीवर आहे. त्या खालोखाल कोल्हापूर परीक्षेत्राचा नंबर लागतो. या अपघातांत जखमी होणार्‍यांमध्येही मुंबई शहराचा पहिला, तर नाशिक परीक्षेत्राचा दुसरा आणि कोल्हापूर परीक्षेत्राचा तिसरा क्रमांक लागतो.
नुकताच एक अहवाल पोलीस प्रशासनाने गृहमंत्रालयाला सादर केला. यामध्ये राज्यात ६१ हजार ८९० इतके अपघात झाल्याचे नमूद केले आहे. हे प्रमाण २०१२ मध्ये ६६ हजार ३१६ इतके होते. ते यंदा कमी झाले आहे. यामध्ये मुंबई शहरात सर्वाधिक २३ हजार ५१२, तर नाशिक ७ हजार ५८२, कोल्हापूर परीक्षेत्रात ६ हजार २३३, ठाणे परीक्षेत्रात ५ हजार ६४० असे अपघात झाले आहेत.
 

Web Title: Shivrajyabhishek's ceremony is ready for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.