शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरकारकडून कमी, सर्वच समाजाच्या तोंडाला पुसली पाने: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:50 IST

कोल्हापूर : अरबी समुद्रात राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतºयाची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी

ठळक मुद्दे विधानसभेत एकटा जाऊन काय चुना लावू?धनंजय महाडिक अनुपस्थित.. शरद पवार पंतप्रधान.. अजित पवार मुख्यमंत्री

कोल्हापूर : अरबी समुद्रात राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्याची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी सोमवारी येथे केला. लिंगायत, धनगर, मुस्लिम आणि मराठा समाजालाही आरक्षण देण्याची आश्वासने देणाºया सरकारने या सर्वच समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची टीकाही आमदार पवार यांनी केली.

येथील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. या नाकर्त्या सरकारला घरी घालविण्याची ताकद राष्ट्रवादीत असल्याचा इशारा नेत्यांनी दिला. या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाने लोकसभा निवडणुकीचे प्रचाराचेच रणशिंग फुंकले. सभेस चांगली गर्दी होती व लोकांतून नेत्यांच्या भाषणाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. सभेला प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, रणजितसिंह मोहिते-पाटील, आदी नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘खरंतर छत्रपतींच्या स्मारकाचा व इंदू मिलच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा निर्णय आमचे सरकार सत्तेत असताना झाला होता. त्याचे श्रेय फडणवीस सरकार घेत आहे. छत्रपतींच्या स्मारकात तर सरकारने महाराजांच्या

पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्याची उंची वाढविली आहे. नक्की किती उंची होती यासंबंधीचे पुरावे सरकारला देण्याची माझी तयारी आहे. महाराष्ट्र हा शिवरायांचा अवमान सहन करणार नाही. आंबेडकर यांच्या स्मारक कामाचे पंतप्रधान टिकाव मारून गेल्यानंतर तिकडे कोण फिरकलेले नाही. एका बाजूला आंबेडकर यांच्याबद्दल आस्था दाखविण्याचा देखावा करणाºया केंद्र सरकारमधील हेगडे नावाचा मंत्री चक्क आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानच बदलण्याची भाषा करत आहे. सरकारला एवढी कसली मस्ती आली आहे आणि कसली धुंदी चढली आहे.? अशी विचारणा पवार यांनी केली.मुंडे म्हणाले,‘ राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास राज्याच्या सर्व भागांतून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वारे बदलत आहे. लोकांच्या मनात राज्य व केंद्र सरकारबद्दल कमालीची नाराजी आहे. समाजातील एकही घटक सरकारबद्दल समाधानी नाही. हे आंदोलन राजकीय नसून लोकांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.’आमदार शिंदे म्हणाले, ‘देशाच्या राजकारणात शरद पवार हेच पुन्हा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने नव्याने राष्ट्रवादीला ताकद द्यावी.’

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘भाजपला पराभव करण्याची शपथ घेऊनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. हे सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आता क्षणभरही विश्रांती नाही.’स्वागत शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले. लाटकर यांच्यासह आर. के. पोवार, आदिल फरास आदींनी सभेचे अत्यंत नेटके नियोजन केले. सभेला झालेली गर्दी पाहून नेत्यांनाही चांगलाच उत्साह संचारला.शरद पवार पंतप्रधान.. अजित पवार मुख्यमंत्रीया सभेत शरद पवार हेच पंतप्रधान व अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सर्वच नेत्यांनी केले. देशाच्या राजकारणात शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. त्यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न महाराष्ट्र सन १९९९ पासून पाहत आहे. आता ती वेळ आली आहे. देशातील हुकूमशहाला बाजूला करण्याचे काम शरद पवारच करू शकतात, हा विश्वास ममता बॅनर्जीपासून अनेक नेत्यांना आहे. तेव्हा आता महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाला ताकद द्यावी, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्याने राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्यायला हवेत, असे आवाहन करण्यात आले.विधानसभेत एकटा जाऊन काय चुना लावू?अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने ‘एकच वादा अजितदादा’ अशी घोषणा केली. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘अरे कसला वादा घेऊन बसला आहेस... जिल्ह्यातून आमचे फक्त दोन आमदार निवडून आले. तिकडे के. पी. पाटील यांचा पराभव तुम्ही ५० हजार मतांनी केला. मी, जयंत पाटील व वळसे पाटील सलग सहा-सहा वेळा निवडून आलो. मोदी लाट होती म्हणून ते वाहून गेले म्हणून सांगता तर आम्ही का गेलो नाही लाटेत.. आणि विधानसभेत मी एकटा जाऊन काय चुना लावू?’ अशी विचारणा पवार यांनी केली. 

धनंजय महाडिक अनुपस्थित..या सभेला पक्षाचे खासदार धनंजय महाडिक अनुपस्थित होते. लोकसभेत मोदी सरकारवर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्याची शक्यता असल्याने शरद पवार यांनीच त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर