शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली, विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाच्या निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 5:33 AM

कोल्हापूर : संवाद आणि विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातील निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील अनुभव खूप उपयोगी पडला.

कोल्हापूर : संवाद आणि विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातील निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील अनुभव खूप उपयोगी पडला. मुंबईतील या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले. ‘लोकमत’ शहर कार्यालयाला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर उपस्थित होते.मुंबई विद्यापीठातील कामगिरी, निकालाची स्थिती, त्याठिकाणी राबविलेली यंत्रणा आदींबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याचे काम आव्हानात्मक होते. ज्यावेळी मी तेथील प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ३०० परीक्षांमधील ५५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर अवघ्या वीस दिवसांत चार लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. यासाठी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणा वापरली.लवकर निकाल लावण्यासाठी तेथील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद, विश्वास या सूत्रावर जोर देत कार्यरत राहिलो. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुणे विद्यापीठापाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाल्याने यातून शिवाजी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. निकालाच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या मुंबई विद्यापीठाला सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्या विद्यापीठाने मदतीचा हात दिला.त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेल्या सकारात्मक कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय, राज्य पातळीवर विश्वासार्हता वाढली आहे.मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचा निकालाचा वेग दिवाळीमुळे मंदावला होता. सुमारे २४ हजार इतके पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावयाचे आहेत.त्यातील आतापर्यंत साधारणत: १२ हजार निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित निकालांचे काम या महिनाअखेरपर्यंत संपविण्यातयेईल.>ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावादेशातील ग्रामीण भागातील विद्यापीठांचे संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने काही चांगले काम सुरू आहे. देशातील वीस विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यामध्ये ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, सध्या देशात राज्यनिहाय, विविध अभ्यासक्रमनिहाय शिक्षणाबाबतचे धोरण आहे. ते बदलून समान धोरण असणे आवश्यक आहे.बांधिलकी मोठीऔरंगाबाद, पुणे, मुंबईच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाबाबतची समाजातील विविध घटकांची मोठी बांधीलकी आहे. त्याची जाणीव मला येथून बाहेर काम करताना झाली असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, ही बांधिलकी विद्यापीठाला मोठे बळ देणारी आहे. त्याच्या जोरावर विद्यापीठाचा विविध क्षेत्रांतील नावलौकिक वाढत आहे.