शिवाजी विद्यापीठाने पाच दिवसात पुरविले १६ लाख लीटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:47+5:302021-07-30T04:24:47+5:30

महानगरपालिकेच्या यंत्रणेद्वारे विद्यापीठातून टँकरने शहराला पाणी पुरविण्यात आले. विद्यापीठाच्या एका जल शुद्धीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठाच्या क्रीडा ...

Shivaji University supplied 16 lakh liters of water in five days | शिवाजी विद्यापीठाने पाच दिवसात पुरविले १६ लाख लीटर पाणी

शिवाजी विद्यापीठाने पाच दिवसात पुरविले १६ लाख लीटर पाणी

महानगरपालिकेच्या यंत्रणेद्वारे विद्यापीठातून टँकरने शहराला पाणी पुरविण्यात आले. विद्यापीठाच्या एका जल शुद्धीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील विहिरीच्या विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागातील संशोधकांमार्फत पाण्याची नमुना तपासणी केली. हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्राप्त झाल्यानंतर त्या विहिरीचे पाणीही उचलण्यास सुरूवात केली. त्याचे नियोजन अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपकुलसचिव आर.पी. यादव आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. दरम्यान, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी क्रीडा अधिविभागाकडील विहिरीमधून येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाहणी बुधवारी केली. दरम्यान, विद्यापीठाने आपल्या परिसरात गेल्या काही वर्षांत सातत्याने जलसंवर्धनाचे, साठवणुकीचे विविध प्रयोग केले आहेत. परिणामी विद्यापीठाच्या परिसरात सुमारे ३२ कोटी लीटर पाणी साठविले जाते. त्याचेच फलित म्हणून महापुरामध्ये भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई काळात विद्यापीठ मदतीसाठी तत्परतेने कार्य करीत आहे.

पॉईंटर

असे पुरविले पाणी (लीटरमध्ये)

रविवारी : २ लाख ७० हजार

सोमवारी : ३ लाख १८ हजार

मंगळवारी : ३ लाख २७ हजार ५००

बुधवारी : २ लाख ७६ हजार

गुरूवारी : ४ लाख २५ हजार

Web Title: Shivaji University supplied 16 lakh liters of water in five days