शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:18 IST

राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे ‘शिवाजी’ हे राज्यातील पहिलेच ठरले आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या मानांकनाचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने

ठळक मुद्देराज्यात पहिल्या, देशात चौथ्या स्थानांवर भरारी । गुणवत्ता हमी कक्षाकडून महत्त्वपूर्ण भूमिका : देवानंद शिंदे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशात शनिवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यापीठाच्या सर्वंकष पाहणी करून ‘आयएसओ ९००१ : २०१५’ हे मानांकन मिळाले. हे मानांकन मिळणारे ‘शिवाजी’ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे ‘शिवाजी’ हे राज्यातील पहिलेच ठरले आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या मानांकनाचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (आयएसओ) या संस्थेकडून हे मानांकन प्रमाणपत्र दिले जाते.विद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ. आर. के. कामत म्हणाले, ‘आयएसओ’ ही संस्था जगभरातील विविध वस्तू, सेवा आणि संस्था यांच्याशी निगडित गुणवत्तेचे, दर्जाचे मूल्यांकन करणारी आघाडीची आणि अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे.

परिणामकारकता, कार्यक्षमता आणि कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता अशा विविध निकषांवर गुणवत्तेचे निर्धारण या संस्थेकडून करण्यात येते. जगात आणि देशात ‘आयएसओ’ सर्टिफिकेशन करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तथापि, गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही असणाºया जर्मनीच्या ट्यू सूद या कंपनीकडून तपासणी करवून घेण्यास शिवाजी विद्यापीठाने प्राधान्य दिले, हे यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘आयएसओ’सारख्या मानांकनामुळे एक टप्पा गाठला आहे. पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी संबंधित घटकांवर आहे. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील ट्यू सूद साऊथ एशिया कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, अनिल साळवी, सुजित पाटील उपस्थित होते.

अंतर्गत आॅडिटरसध्याचे प्रमाणपत्र हे ९ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे आहे. मात्र, ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणारी नसून या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे ३७ तज्ज्ञ अंतर्गत तपासनिसांची (अंतर्गत आॅडिटर) फळी निर्माण केली आहे.

का मिळाले मानांकनसातत्यपूर्ण प्रगती करणारा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षनाविण्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणारे विद्यापीठ (तुरुंगातील कैद्यांसाठी अभ्यासक्रम)वेळेत निकाल लावण्याची परंपरादुर्मिळ हस्तलिखिते असणारे सुसज्ज गं्रथालयवि.स.खांडेकर संग्रहालयाचे वेगळेपणसाडेतीन हजार शिक्षकांना प्रशिक्षित करणारे सायबर सिक्युरिटी केंद्र