मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:25 IST2018-08-15T00:25:46+5:302018-08-15T00:25:50+5:30

मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेचा एल्गार
कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा नारा मंगळवारी सायंकाळी शिवाजी पेठेत घुमला. शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळानजीक अपना बँकेजवळ ‘मराठा आरक्षण मिळावे’ असा भव्य फलक उभारण्यात आला.
मराठा आरक्षणाचा जागर करणाऱ्या या फलकाचे उद्घाटन वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणासह ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, विक्रम जरग, अजित राऊत, मोहन साळोखे, सुरेश जरग, शाहीर दिलीप देसाई, श्रीकांत भोसले, अजय इंगवले, सुभाष साळुंखे, मोहन साळोखे, राजेंद्र चोपदार, भानुदास इंगवले, अशोक देसाई, अजित खराडे, अजित साळोखे, धनंजय नवरुखे, भाऊ शिर्के, राजू सावंत, मनोज शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
सोमवारी मोर्चा, २५ ला महाआरती
सोमवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता निवृत्ती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातर्फे निवड केलेल्या
१0 महिलांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. २५) सायंकाळी साडेसात वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात मराठा आरक्षणसाठी महाआरतीचे आयोजन केले आहे.