शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

तीनशे विद्यापीठांमध्ये पोहोचले ‘शिवाजी द ग्रेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:16 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास मांडणाºया आणि पुनर्संपादन झालेल्या पाच खंडांचा हा ग्रंथ आतापर्यंत देशभरातील तीनशे विद्यापीठांत पोहोचला आहे.

संतोष मिठारी कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या शिवचरित्राचा पुनर्जन्म कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांपूर्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास मांडणाºया आणि पुनर्संपादन झालेल्या पाच खंडांचा हा ग्रंथ आतापर्यंत देशभरातील तीनशे विद्यापीठांत पोहोचला आहे.या पुनर्संपादनातून नव्याने १८०० पानांचा पाच खंडांचा ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथाचे संपादन सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केले. योग्य संदर्भसाधनांच्या आणि इंग्रजी भाषेतील प्रभावी शिवचरित्राअभावी देश-विदेशांतील विद्वानांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये शिवचरित्राची योग्य मांडणी झालेली नाही. त्यामुळे आजही इतिहास संशोधकांना शिवचरित्राची उणीव भासते. ती भरून काढत डॉ. बाळकृष्ण लिखित हे शिवचरित्र देश-विदेशांतील विद्यापीठांमधील विद्यार्थी, अभ्यासक संशोधकांना उपलब्ध व्हावे यासाठी सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रातर्फे जगभरातील विद्यापीठांना भेट म्हणून मोफत पाठविण्यात येत आहे. त्याची सुरुवात १३ आॅगस्ट २०१७ रोजी करण्यात आली. यानंतर आतापर्यंत भारतातील तीनशे विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये हा ग्रंथ पोहोचला आहे. यामध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जेएनयु, बनारस हिंदू विश्वविद्यालय, बनस्थली विद्यापीठासह आसाम, कोलकाता, बिहार, आदी राज्यांतील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. या विद्यापीठांना दिलेल्या ग्रंथांत संपादकीय खंड, ‘शहाजी,’ ‘शिवाजी द ग्रेट’ भाग एक व दोन, ‘शिवाजी द मॅन अ‍ॅँड हिज वर्क’ या खंडांचा समावेश आहे. देशभरातील इतिहास संशोधक, अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राकडून पुनर्संपादनमुल्तान, पंजाबसारख्या प्रदेशांतून आलेले व लंडन विद्यापीठातून पीएच. डी. केलेले डॉ. बाळकृष्ण हे राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी सन १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते शिवरायांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडांत प्रसिद्ध केले होते; पण, दुर्दैवाने काळाच्या ओघात हे महान शिवचरित्र विस्मरणात गेले होते. ते पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचे काम गतवर्षी या खंडांच्या पुनर्संपादनाद्वारे केले असल्याचे सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज