शिवाजी विद्यापीठात शिवरायांचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:38 IST2020-02-19T16:36:30+5:302020-02-19T16:38:59+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे , प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदींनी अभिवादन केले.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठात सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. त्यापूर्वी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या झांज, ढोलताशा, लेझीम पथकांनी यावेळी नेत्रदीपक सादरीकरण करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत, आदी उपस्थित होते.
संत रविदास यांना अभिवादन
या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.