शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिवाजी पूल, गॅस दाहिनीचे काम प्रगतिपथावर-उर्वरित कामे आठवड्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:26 AM

पर्यायी शिवाजी पूल आणि पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिट दि.२६ मार्चला टाकण्यात आले आहे. आता सोमवारी पुलामध्ये बसविण्यात आलेल्या बेअरिंगच्या केबल्स मशीनद्वारे ओढून पुढील काम करण्यात येणार आहे. त्याशिवाय पंचगंगा स्मशानभूमीत बसविलेल्या गॅस दाहिनीच्या फौंडेशनचे

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल आणि पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिट दि.२६ मार्चला टाकण्यात आले आहे. आता सोमवारी पुलामध्ये बसविण्यात आलेल्या बेअरिंगच्या केबल्स मशीनद्वारे ओढून पुढील काम करण्यात येणार आहे. त्याशिवाय पंचगंगा स्मशानभूमीत बसविलेल्या गॅस दाहिनीच्या फौंडेशनचे काम पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून येत्या चार दिवसांत त्यावर धूर जाण्यासाठी सुमारे ६५ फूट उंचीची चिमणी बसविण्याचे काम सुरू होत आहे.

पर्यायी शिवाजी पुलाचे काम अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर पूर्णत्वाकडे जात आहे. या पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिटचे काम दि. २६ मार्चला दिवसभरात पूर्ण झाले. त्यानंतर सोमवारपासून या पुलात घातलेल्या बेअरिंग्जमधील केबल्स मशीनद्वारे ओढून त्यात ताकद निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाचा कठडा तयार करणे, जुन्या ठेकेदारांनी केलेल्या पुलाच्या कठड्याची उंची वाढविणे, पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस काही भाग काँक्रिटचा कोबा करणे, मुरूम टाकणे, डांबरीकरण आदी कामे केली जाणार आहेत. दरम्यान, कोल्हापुरात  महापालिकेच्या तीन स्मशानभूमीत दरवर्षी सुमारे साडेतीन हजार मृतदेहांचे दहन केले जाते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगाराव्यतिरिक्त सुमारे ३५ लाख रुपये खर्च करावा लागतो. या खर्चाला फाटा देण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे.

हे दाहिनीचे कामही मधल्या टप्प्यात रेंगाळले असले तरी आता ते युद्धपातळीवर सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी या गॅस दाहिनीच्या धुरांड्याच्या चिमणीसाठी फौंडेशन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह दहनानंतर त्याच्या वायूचे हवेतच विघटन व्हावे या उद्देशाने त्या फौंडेशनवर सुमारे ६५ फूट उंच चिमणी बसविण्यात येणार आहे. हे काम चार दिवसांत सुरू होत आहे. या गॅस दाहिनीची चाचणीही घेण्यात आली आहे. त्यामुळे ही गॅस दाहिनी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर