शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

Shivjayanti Kolhapur : मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 6:30 PM

Shivjayanti Kolhapur : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पारंपारिक पद्धतीने येणाऱ्या शिवजयंती उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी गुरुवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात संयुक्त जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळ , संयुक्त रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ,शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.

ठळक मुद्देमोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात कोरोना निर्बंधाचे सर्वत्र पालन : सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत साधेपणाने साजरी

 कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पारंपारिक पद्धतीने येणाऱ्या शिवजयंती उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी गुरुवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात संयुक्त जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळ , संयुक्त रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ,शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.मंगळवार पेठ, राजर्षि शाहू तरुण मंडळमंगळवार पेठेतील राजर्षि शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे शासकीय नियम पाळून सुशिला देसाई, लता डवरी, वासंती घोरपडे, दीपाली धनवडे, शिल्पा सरवदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर पाळणा म्हणण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बाबुराव चव्हाण, आनंदराव पायमल, अशोक पोवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, बापू आवळे, बाबा पाटेर्, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.शिवाजी पेठ, नेताजी तरुण मंडळशिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाच्यावतीने पारंपारीक शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्या हस्ते शिव प्रतिमा पूजन झाले. यावेळी मंडलाचे अध्यक्ष राजू साळोखे, लालासाहेब गायकवाड, शिवाजीराव पोवार, जयवंतराव साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, रविंद्र राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थाजुना बुधवार पेठेतील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवप्रार्थना प्रेरणास्त्रोत पठण करण्यात आले यासोबतच शिवशस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. यानिमित्त परिसरातील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत, सचिव सुशिल भांदीगरे, संजय पाटील, उदय भोसले, नागेश घोरपडे, अनिल निकम, मकरंद स्वामी, राजू कुंडले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संदीप देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.उत्तरेश्वर पेठेतील संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती सोहळा समितीतर्फे गुरुवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे सुनील कांबळे, तुलसीदास कांबळे, विलास कांबळे, राजेंद्र कांबळे, (सर्व स्मशानभूमीतील कर्मचारी) यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्वांचा उत्तरेश्वर पेठेतर्फे कोरोना योद्दा म्हणून शाल श्रीफ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे किशोर घाडगे, भाऊ घोडके, दीपक काटकर, विराज चिखलीकर, सुरेश कदम, विनायक साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीसंयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे बिंदु चौकात शिवजयंतीनिमित्त महापालिका कर्मचारी प्रिती चंदुगडे, पूजा भोर, सेजल मोरे यांच्या हस्ते पुतळा व पाळणा पुजन झाले. यावेळी जयेश कदम, जयेश ओसवाल, सचिन तोडकर, आप्पा लाड, प्रविण सोनवणे, संजय कदम, महेश ढवळे, बाळासाहेब मुधोळकर, सुधीर खराडे, अजित गायकवाड,वनिता ढवळे, पूजा शिराळकर, धनश्री तोडकर आदी उपस्थित होते.छत्रपती शहाजी तरुण मंडळछत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शहाजी तरुण मंडळातर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहर वाहतुक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते गुरुवारी पाळणा पुजन झाले. यावेळी आर.के,पोवार, ईश्वर परमार, आदील फरास, उदय शिंदे, सागर शिंदे, संजय केसरकर, शिवाजी यादव, हेमंत मेंहदळे आदी उपस्थित होते.हिंदु एकताहिंदु एकता संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पु्ष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर वाहतुक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आण्णा पोतदार, बापू वडगावकर, गजानन तोडकर, सुरेश काकडे, हिंदुराव शेळके, सुरजित गायकवाड, विलास मोहीते, दिलीप सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर