शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी शहर परिसरात शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

इचलकरंजी : शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी मांडव घालून शिवकालीन ...

इचलकरंजी : शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी मांडव घालून शिवकालीन पोवाडे लावण्यात आले होते. तसेच जयंतीनिमित्त काही उपक्रमही राबविण्यात आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला फाटा देण्यात आला असला तरी, अनेक हौशी शिवप्रेमी मोटारसायकल व गाड्यांना भगवा ध्वज लावून फेरफटका मारत होते.

बसस्थानक चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पहाटेपासून अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा जयघोष करत डौलाने भगवे ध्वज फडकवत उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली. काही मंडळांनी रक्तदान शिबिर, गरजूंना साहित्य वाटप असे उपक्रम राबविले. मुख्य मार्गावरील एका मंडळाने महाराजांची मूर्ती मिरवणुकीने आणून प्रतिष्ठापना केली. त्यामुळे शहर शिवमय बनले होते.

महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उदयसिंह पाटील, अजित जाधव आदींनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.

ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे व जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते. यावेळी अशोक सौंदत्तीकर, प्रकाश मोरे, विलास गाताडे, सुनील पाटील, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, सागर कम्मे, नरसिंह पारीक, जेवरबानू दुंडगे, नंदा साळुंखे, नजमा शेख, संगीता कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. इंगळी : येथे शिवजयंती सोहळा शिस्तबद्ध व साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पन्हाळ्याहून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन दिग्विजय खोत यांनी व शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कबनूर : येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शोभा पोवार यांनी केले. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, मधुकर मणेरे, सैफ मुजावर, सुधीर लिगाडे, रोहिणी स्वामी, सुलोचना कट्टी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी १९०२२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत मुख्य मार्गावरील एका मंडळाने महाराजांची मूर्ती मिरवणुकीने आणून प्रतिष्ठापना केली.

छाया-उत्तम पाटील

१९०२२०२१-आयसीएच-०३ इचलकरंजी नगरपालिकेच्यावतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अजित जाधव, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.