शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराज जन्मस्थळी शिवसेनेचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 12:44 IST

चंद्रकांत पाटील शाहू जन्मस्थळी पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते.

कोल्हापूर : राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील  शाहू जन्मस्थळी येऊन महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र, चंद्रकांत पाटील शाहू जन्मस्थळी पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते. चंद्रकांत पाटील तेथे पोहोचताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. 

शाहू महाराजांविषयीचे अनेक प्रकल्प अर्धवट असल्याने प्रवेशव्दाराजवळच जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. पालकमंत्री आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला तेथील शाहू पुतळ्यास अभिवादन केले व आंदोलकांशी चर्चा केली. रखडलेले जन्मस्थळाचे काम, राधानगरी धरणावरील विद्युतनिर्मीती केंद्राची सुरूवात, शाहू मिल येथे गारमेंट पार्क, महाराजांची समाधी, महाराजांनी प्रवास केलेली बोगी याबाबत पवार आणि देवणे यांनी विचारणा केली. 

अर्धवट प्रकल्पांबाबत गती देण्याच्या सुचना करू आणि शाहू मिलच्या जागेवरील प्रकल्पाबाबत २0 जुलैनंतर बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी कमलाकर जगदाळे, शशी बिडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरBJPभाजपाSanjay Pawarसंजय पवारShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती