नृसिंहवाडीत कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:18 PM2020-08-08T19:18:51+5:302020-08-08T19:20:07+5:30

बेळगाव जिल्ह्य़ातील मनगुत्तीमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी रात्री हटवला. त्याचे पडसाद कर्नाटक बरोबर महाराष्ट्रातही उमटले आहेत.

Shiv Sena's agitation against the Karnataka government in Nrusinhwadi | नृसिंहवाडीत कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ येथील स्वागत कमानीजवळ मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

Next
ठळक मुद्देनृसिंहवाडीत कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलनयेडियुरप्पा यांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध

नृसिंहवाडी- बेळगाव जिल्ह्य़ातील मनगुत्तीमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी रात्री हटवला. त्याचे पडसाद कर्नाटक बरोबर महाराष्ट्रातही उमटले आहेत.

शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने नृसिंहवाडी येथील स्वागत कमानी समोर निषेध करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, युवासेनेचे प्रतिक धनवडे यांनी कर्नाटक सरकारने हटविलेला पुतळा परत सन्मानाने बसवावा अन्यथा कर्नाटकात घुसुन शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला.

आंदोलनात संतोष धनवडे, प्रदीप खोचरे, जयवंत मंगसुळे, बाबासाहेब सावगावे, गणेश सुतार, सनी माने, अभिजित शिंदे, किरण माने, शुभम पवार, शिरीष सुतार, अच्युत सुतार, मल्हार कुलकर्णी, अमर गोंधळी, बाबासाहेब गावडे, यांच्या सह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.



 

Web Title: Shiv Sena's agitation against the Karnataka government in Nrusinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.