शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

By राजाराम लोंढे | Updated: February 20, 2024 12:17 IST

शिवसेना (उबाठा) नेत्यांची चाचपणी, ‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसी  

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघावरचा शिवसेनेने (उबाठा) अद्याप दावा सोडला नसला तरी मतदारसंघ घेतला तर विजयी होईल का? अन्यथा यावरील दावा सोडून त्याबदल्यात इतर सुरक्षित मतदारसंघ घ्यावा का? याची चाचपणी पक्षात सुरू आहे. काँग्रेसचे अजून प्रयत्न सुरू असले तरी त्यांच्याकडे तगडा उमेदवार सध्या तरी दिसत नाही. त्यांची सगळी मदार शाहू छत्रपती यांच्यावर दिसत असून, दोन दिवसांत आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.‘उबाठा’कडून ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या तिघांना बोलावून घेऊन उलटसुलट चाचपणी केली आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे, त्यांची राजकीय ताकद आणि शह-काटशहाच्या राजकारणात कोण कोण मदत करू शकतो? याची माहिती घेतली आहे.पक्षाने अद्याप जागेवरील दावा सोडला नसला तरी जागा घेतली तर तिथे यश मिळेल का? याची खात्री पक्षनेतृत्वाला नाही. या जागेवरील हक्क सोडू नये, असा पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे बहुतांशी मतदारसंघात पक्षाने सिग्नल दिले असले तरी कोल्हापूरबाबत मात्र अद्याप वेट अँड वॉच अशीच भूमिका आहे.पश्चिम महाराष्ट्रात ‘उबाठा’ गटाची ‘मावळ’वरच बोळवण?पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या जागांपैकी ‘कोल्हापूर’ व ‘मावळ’वर शिवसेनेने (उबाठा) दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ‘बारामती’, ’शिरूर’, ‘माढा’, ‘सातारा’ हे चार, तर काँग्रेसकडे ‘पुणे’, ‘सोलापूर’ व ‘सांगली’ची जागा राहणार आहे. ‘हातकणंगले’ ही जागा स्वाभिमानीला सोडली जाऊ शकते. ‘स्वाभिमानी’ने नकारच दिला तर ‘उबाठा’ कडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा पत्ता पुढे केला जाऊ शकतो. कोल्हापूरच्या जागेवर अजूनही जर-तर आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ‘मावळ’वरच बोळवण होण्याची शक्यता आहे.‘जालना’, ‘कोल्हापूर’वर जागा वाटप आडलेमहाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जागा वाटपावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे कोणी कोणत्या जागेवर लढायचे हे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईतील एका मतदारसंघासह ‘जालना’ व ‘कोल्हापूर’वर काँग्रेसने दावा केल्याने जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसीज्येष्ठ नेते शरद पवार आज, मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असून, ते रात्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरी जेवण करणार आहेत. दोन्ही काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून, येथेच ‘कोल्हापूर’बाबत व्यूहरचना ठरली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस