शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता

By राजाराम लोंढे | Updated: March 30, 2024 13:15 IST

काँग्रेसवर दबावाचे राजकारण; देवणे, शिंत्रे, संजय पवार कोकणात तर मोदी प्रचारासाठी सांगलीत

कोल्हापूरसांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मैत्रीपुर्ण लढतीची तयारी सुरु केल्याने शिवसेनेमध्ये (उबाठा) अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने ‘कोल्हापूरा’तील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारातून काहीसे अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे हे कोकणात तर शहरप्रमुख सुनील मोदी हे सांगलीला प्रचारासाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने (उबाठा) डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मैत्रीपुर्ण लढतीची तयारी काँग्रेसने केल्याने चंद्रहार पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने दबाव वाढवल्यानंतर शिवसेनेनेही कॉग्रेसच्या उमेदवाराच्या ठिकाणी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच गेल्या आठ-दहा दिवस काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात सक्रीय असणारे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून अलिप्त राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले आहेत. त्यानुसार संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आदी पदाधिकारी हे शिवसेनेचे सिंधुदुर्ग -रत्नागिरी’चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर सुनील मोदी हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी सांगलीला गेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या हाती धोपाटनेपश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या जागेपैकी शिवसेनेला ‘मावळ’, ‘हातकणंगले’ मतदारसंघ सोडले होते. त्यातील ‘हातकणंगले’त शेट्टींना पाठींबा देण्याचा आघाडीचा निर्णय झाल्याने या जागेचा त्यांना उपयोगच नाही. त्यामुळे ‘सांगली’ची जागा त्यांनी घेतली, तीही सोडायची म्हटले तर शिवसेनेच्या हाती धोपाटणेच येणार हे निश्चित आहे.

तर, कोल्हापूरातही मैत्रीपुर्ण लढतकाँग्रेसने सांगलीत मैत्रीपुर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात तसेच करु, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्यानुसारच, कोल्हापूरातही मैत्रीपुर्ण लढत देऊया त्याची तयारी सुरु करा, अशा सूचना ‘मातोश्री’वरुन आल्या असून त्यातूनच डॉ. चेतन नरके, विजय देवणे यांचे नाव पुढे येऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीcongressकाँग्रेस