कोल्हापूर : रंकाळा परिसरातील पद्माराजे गार्डनमध्ये उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसास शिंदे सेनेच्या युवा सेनेचा उपशहरप्रमुख योगेश विलासराव चौगले (वय ३२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याने धक्काबुक्की केली होती. रविवारी (दि. ३१) रात्री घडलेल्या प्रकारानंतर जुना राजवाडा पोलिसांनी हल्लेखोर चौगले याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चौगले याने कॉन्स्टेबल गोरख शंकर पाटील (वय २६) यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने हल्लेखोरास अटक करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
कोल्हापुरात पोलिसाला धक्काबुक्की करणारा शिवसेनेचा पदाधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:00 IST