फुले, भाजी विक्रेता ते आमदार, रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे सुपुत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:38 PM2022-05-12T14:38:53+5:302022-05-13T10:55:11+5:30

हाडाचा शिवसैनिक म्हणून ‘मातोश्री’वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Shiv Sena MLA Ramesh Latke's astonishing political journey, Son of Shahuwadi in Kolhapur district | फुले, भाजी विक्रेता ते आमदार, रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे सुपुत्र

फुले, भाजी विक्रेता ते आमदार, रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे सुपुत्र

googlenewsNext

इस्माईल महात

येळवण जुगाई (कोल्हापूर) : शिवसेनेचे आमदार रमेश कोंडीबा लटके (वय-५२) यांचे काल, बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने दुबई येथे निधन झाले. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसला.

आमदार रमेश लटके हे शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई जवळच्या शेम्बवणे पैकी धुमकवाडी या छोट्या गावातील मूळ रहिवासी होते. येळवण जुगाई येथे त्यांचे घर आहे. कोरोना काळापासून त्याचे आई-वडील येळवण जुगाई येथेच राहात आहेत. त्यांचा एक भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

वडिलांसोबत मुंबईत दुधाचा व्यवसाय

वडिलांसोबत त्यांनी मुंबईत दुधाचा व्यवसाय, फुलांच्या माळा (हार) विकण्याचा व्यवसायाने आपली कारर्कीद सुरु केली. यातून त्यांनी लोकसंपर्काच्या जोरावर शिवसेना शाखा प्रमुख, मुंबई महानगरपालिकेचे प्रथम १९९७ साली नगरसेवक झाले. पुढे २००२ आणि २००९ रोजी नगरसेवक झाले असे सलग तीनदा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, बेस्ट अध्यक्ष आणि पुढे २०१४ व २०१९ साली सलग दोन वेळा आमदार झाले. असा सर्वसामान्यांना थक्क करणारा राजकीय प्रवास केला.

शाहूवाडी विधानसभेची लढवली होती पोटनिवडणूक

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर रमेश लटके यांनी शाहूवाडी-पन्हाळा विद्यानसभा (सन २०००) पोटनिवडणूक लढवली होती. शाहूवाडी तालुक्यात शिवसेना संघटना बांधणीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. पण आपण राहात असलेल्या गावात स्थानिक राजकारणात भाग घेतला नाही.

सलग दोनवेळा आमदार

काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांचा पराभव करुन २०१४ मध्ये रमेश लटके हे  पहिल्यांदा आमदार झाले. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांना पराभूत केले होते. हाडाचा शिवसैनिक म्हणून ‘मातोश्री’वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याकडून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

शाहूवाडीतील गोतावळा मुंबईकडे रवाना

त्यांच्या निधनाची बातमी समजताच येळवण जुगाई येथे राहत असलेले त्यांचे आई-वडील व भावकी व पाहुणे मंडळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई येथे त्यांच्यावर अंतविधी होणार आहेत.

Web Title: Shiv Sena MLA Ramesh Latke's astonishing political journey, Son of Shahuwadi in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.