शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरवात, नागाळा पार्क शाखेचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 17:51 IST2020-12-07T17:48:16+5:302020-12-07T17:51:47+5:30
SanjayMandlik, ShivSena, Kolhapurnews महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी शिवसैनिकांना केले. आरटीओ ऑफीस येथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आणि नागाळा पार्क शिवसेना शाखा उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापुरातील आरटीओ ऑफीस येथून शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सोमवारी सुरवात झाली. येथील शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार संजय मंडलिक, संजय पवार, विजय देवणे, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी शिवसैनिकांना केले. आरटीओ ऑफीस येथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आणि नागाळा पार्क शिवसेना शाखा उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
मंडलिक म्हणाले, महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात येण्यासाठी आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे. शिवसेना सदस्य नोंदणीसोबत मतदार नोंदणी अभियानही यशस्वीपणे राबवा. सामान्य नागरीकांचे प्रश्न सोडवा. प्रत्येक घरात शिवसैनिक असण्यासाठी प्रभावी सदस्य नोंदणी करा.
यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरीक शरद सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रमुख विजय देवणे, शाखा प्रमुख संजय जाधव, राजू जाधव, शुभांगी पोवार, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, चंदू भोसले, राजू यादव, अभिजत बुकशेट आदी उपस्थित होते.