शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर 

By समीर देशपांडे | Updated: December 30, 2023 13:57 IST2023-12-30T13:56:42+5:302023-12-30T13:57:19+5:30

कोल्हापूर :  शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील दौरा लांबणीवर गेला आहे. ३ आणि ४ जानेवारी २०२४ रोजी ...

Shiv Sena leader Aditya Thackeray visit to Kolhapur postponed | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर 

कोल्हापूर:  शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील दौरा लांबणीवर गेला आहे. ३ आणि ४ जानेवारी २०२४ रोजी होणारा हा दौरा आता ९ व १० जानेवारी रोजी होणार आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ही माहिती दिली.

पूर्वनियोजनानुसार ठाकरे यांच्या पहिल्या आठवड्यातील दौऱ्याच्या नियोजनासाठी शनिवारी सकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष सुनील मोदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र ही बैठक संपतानाच मुंबईहून आलेल्या निरोपानुसार आदित्य यांचा हा दौरा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

नियोजनानुसार ठाकरे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शहरात आणि हातकणंगले मतदारसंघात अशा दोन जाहीर सभा होणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Shiv Sena leader Aditya Thackeray visit to Kolhapur postponed