शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:41 IST

CoronaVIrus Shivsena Kolhapur : शिवसेना शहर कार्यालय येथे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने पाच लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपपर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे साधले औचित्य

कोल्हापूर : शिवसेना शहर कार्यालय येथे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने पाच लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.यानंतर सेवाभावी संस्थांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान केले. गांधी मैदान येथील कै. विष्णुपंत इंगवले कोविड सेंटरला एक लाख, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरला पन्नास हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोविड सेंटरला पन्नास हजार अशी मदत करण्यात आली.कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले.यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, अरुण सावंत, सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, मणेर मस्जिद ट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर