कोल्हापुरात शिवसैनिकांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा, पीएफआय संघटनेवर कायमची बंदी घालण्याची केली मागणी
By भारत चव्हाण | Updated: September 28, 2022 18:11 IST2022-09-28T18:10:55+5:302022-09-28T18:11:04+5:30
कोल्हापूर : भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच भारतातील दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध ...

कोल्हापुरात शिवसैनिकांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा, पीएफआय संघटनेवर कायमची बंदी घालण्याची केली मागणी
कोल्हापूर : भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच भारतातील दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला.
यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी बिंदू चौकाचा परिसर दुमदुमून गेला. भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना शासनाने अद्दल घडवावी तसेच या देशद्रोही संघटनेवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, रवी चौगुले, मंजित माने, सुशील भांदिगरे, दीपक गौड, धनाजी जाधी, शुभांगी पोवार, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.