गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:10 IST2021-02-09T19:08:11+5:302021-02-09T19:10:06+5:30
Shivjayanti Kolhapur- युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा तथा शिवजयंती गडहिंग्लजकरांची समितीच्या अध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी यांनी शिवजयंती कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, बसवराज खणगावे, नितीन देसाई, किरण कापसे आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा तथा शिवजयंती गडहिंग्लजकरांची समितीच्या अध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज नगरपालिकेसह समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने लोकराजा शिवरायांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शुक्रवार (१९) रोजी शिवजयंतीदिनी दुपारी ४ वाजता शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये शहरातील सर्व तरूण मंडळे, महिला मंडळे, बचत गट आणि शाळा-महाविद्यालये सहभागी होणार आहेत.
लोकोत्सवाच्या माध्यमातून शिवरायांना अभिप्रेत असणारी सर्वधर्म समभावाची भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अठरा पगडजातीच्या सर्व समाजघटकांना लोकोत्सवात सहभागी करून घेतले जाणार आहे.
शिवजयंतीप्रमाणेच महात्मा बसवेश्वर जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदेखील लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही कोरी यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, नगरसेवक नितीन देसाई, विनोद बिलावर उपस्थित होते.
चित्ररथासाठी बक्षीसे
शिवजयंतीदिनी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत चित्ररथांचा समावेश असेल. त्यासाठी अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार व २ हजार अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
शोभायात्रेचे आकर्षण
हत्ती, घोडे व बैलजोडींसह महिलांचे लेझीम पथक व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके हे शोभायात्रेचे खास आकर्षण असणार आहे.