शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वारणानगर परिसरात शिवजयंती उत्सव दिमाखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

वारणानगर : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फ्रेंडस्‌ पॉवर व वाघांची तालीम यांच्या वतीने ...

वारणानगर : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फ्रेंडस्‌ पॉवर व वाघांची तालीम यांच्या वतीने यावर्षीही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा ५ हजारांवर शिवभक्तांनी लाभ घेतला.

अमृतनगर मुख्य फाटा येथे फ्रेंडस्‌ पॉवरच्या वतीने शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन दलितमित्र जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने व फ्रेंडस्‌ पॉवरचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ऊर्फ अप्पा माने यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व कार्यक्रम रद्द करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, पेठवडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजप नेते पी.डी. पाटील, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

यावेळी अध्यक्ष विश्वास ऊर्फ अप्पा माने, अक्षय मोरे, अर्जुन सिद, युसूफ मुल्ला, संजय पाटील, संभाजी मलगुंडे, प्रदीप पाटील, संभाजी पाटील, निवास पाटील यांच्यासह फ्रेंडस्‌ पाॅवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पन्हाळगडावरून शिवज्योती घेऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, जिल्ह्यात चाललेल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.

..

फोटो ओळी १८ अमृतनगर शिवजयंती

वारणानगर- अमृतनगर येथे छात्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल संचालित फ्रेंडस्‌ पॉवरच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करताना जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, नगराध्यक्ष मोहनलाल माळी,अध्यक्ष अप्पा माने व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.