कोल्हापूर : येथील शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारी दिमाखात सुरुवात झाली. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात भव्य शौर्य पीठाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शिव छत्रपतींच्या स्फूर्ती गीतावर आकर्षक आतषबाजीमध्ये याचा उद्घाटन सोहळा झाला. यामुळे शिवाजी पेठेतील वातावरण शिवमय झाले होते. येथे २२ फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन शिवजयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सचिव महेश जाधव, संचालक अजित खराडे, केशवराव जाधव, श्रीकांत भोसले, लाला गायकवाड, विजय माने, चंद्रकांत यादव, राजेंद्र चव्हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक इंगवले आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात शिवाजी पेठेतील शिवजयंती उत्सव सुरु; आकर्षक विद्युतरोषणाईने लक्ष वेधले, २२ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:29 IST