शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यातील २६ गावांमधून शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : आजरा तालुक्यात महिलांच्या लेझीम स्पर्धा, रक्तदान शिबिर, प्रतिमापूजन व विविध गडांवरून शिवज्योत आणून शिवजयंती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आजरा : आजरा तालुक्यात महिलांच्या लेझीम स्पर्धा, रक्तदान शिबिर, प्रतिमापूजन व विविध गडांवरून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी करण्यात आली. मराठा महासंघाच्यावतीने आजऱ्यात झालेल्या लेझीम स्पर्धेत कोवाडे येथील सातेरी कन्या लेझीम पथकाने प्रथम क्रमांक मिळवला. तालुक्यातील २६ गावांमधून शिवजयंती साजरी करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासूनच गावागावात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पोवाडे लावण्यात आले होते. शिवजयंती उत्सव कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने साजरा करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही अनेक गावांमध्ये पारगड, रांगणा, प्रतापराव गुर्जर स्मारक, पन्हाळा येथून शिवज्योत आणून मिरवणूक काढण्यात आली. आजरा महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. अशोक सादळे, गंगामाई वाचनालयात अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर, आजरा पंचायत समितीमध्ये सभापती उदयराज पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजरा तालुका मराठा महासंघाच्यावतीने महिलांच्या लेझीम स्पर्धा घेण्यात आल्या. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, महिला आघाडीप्रमुख रचना होलम, नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी पुष्पहार घातला. यानंतर लेझीम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सात संघांनी भाग घेतला होता. बक्षीस वितरण मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारूती मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ---------------------------

*

महिलांच्या लेझीम स्पर्धा

लेझीम स्पर्धेत प्रथम सातेरी कन्या लेझीम पथक, कोवाडे, द्वितीय भावेश्वरी, हाजगोळी खुर्द, तृतीय आवंडी महिला, आवंडी वसाहत तर उत्कृष्ट हलगीवादक म्हणून कोवाडे संघाचे जोतिबा जगदाळे यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ---------------------------

* रक्तदान शिबिरातून शिवजयंती

तालुक्यातील चार गावांमध्ये रक्तदान शिबिर तर तीन गावांमध्ये पुतळा पूजन तर २२ गावांमध्ये प्रतिमापूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात साळगाव, लाटगाव, उत्तूर, कोवाडे येथील तरूणांनी भाग घेतला.

.

---------------------------

* फोटो ओळी : आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.

दुसऱ्या छायाचित्रात मराठा महासंघाच्यावतीने आयोजित महिलांच्या लेझीम स्पर्धेतील एक क्षण.

क्रमांक : १९०२२०२१-गड-०८/०९