शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोलीत भुयारी मार्ग, अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:27 IST

लोकमत'ने मांडली होती समस्या

शिरोली : येथील शालेय विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडतानाची जीवघेणी कसरत खासदार धैर्यशील माने आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले.महामार्गामुळे शिरोली गावचे विभाजन झाले आहे. शिरोली गावच्या पूर्वेला शिवाजीनगर, यादववाडी, मेनन काॅलनी, व्यंकटेशनगर, चौगुले मळा अशी लोकवस्ती आहे. तर पश्चिम बाजूस सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय कार्यालये आहेत. शाळेसाठी सध्या चारपदरी महामार्ग ओलांडून हजारो मुले पूर्वेकडून पश्चिमेकडे येतात.

यासाठी मुलांना मोठी कसरत करावी लागते; पण सहापदरी रस्ता झाला तर मुले रस्ता ओलांडून येऊ शकणार नाहीत. मुलांना दीड किलोमीटरपर्यंत नागाव फाटा किंवा शिरोली फाट्यापर्यंत पायपीट करावी लागेल. म्हणून शिवाजीनगर कमान, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा बाळूमामा मंदिर समोर भुयारी मार्गाची मागणी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली.यावेळी खासदार माने आणि महामार्गाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करू, असे आश्वासन दिले. यावेळी महामार्ग अधिकारी वसंत पंदरकर, सी. बी. भरडे, वैभव पाटील, महेश पाटोळे, मिलिंद राव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच अविनाश कोळी, माजी उपसरपंच सुरेश यादव, युवासेना अध्यक्ष योगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे, कृष्णात करपे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.लोकमत'ने मांडली होती समस्यागेल्या १७ वर्षांपासून फक्त शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील हजारो विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडतात. याबाबत ‘लोकमत’ने ६ ते ८ नोव्हेंबर अशी दोन दिवस मालिका प्रसिद्ध करून आवाज उठवला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग