शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची पिस्तुलाची न्यायालयात एन्ट्री, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:22 IST

वाठारचे सुरेश नरके अटकेत, पिस्तूल जप्त

कोल्हापूर : सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात गेलेला पक्षकार सुरेश संभाजी नरके (वय ४२, रा. वाठार तर्फे वडगाव, ता. हातकणंगले) हा थेट कमरेला पिस्तूल लावून न्यायाधीशांसमोर पोहोचला. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयात ड्युटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल संजय रघुनाथ पारळे यांनी नरके याला बाहेर बोलवून त्याच्याकडील दीड लाख रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले. हा प्रकार सोमवारी (दि. १४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. न्यायालयात कोणतेही शस्त्र घेऊन जाण्यास बंदी असताना थेट पिस्तूल घेऊन आलेला पक्षकार सापडल्याने खळबळ उडाली. त्याला पोलिसांनी अटक केली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नरके याने जमिनीच्या वादातून जून २०१७ मध्ये पेठ वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्याची सुनावणी सोमवारी न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर होती. त्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास नरके न्यायालयात पोहोचला. वारंवार कमरेला हात लावत तो कोर्टरूममध्ये गेला.संशय आल्याने ड्युटीवरील कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी नरके याला बाहेर बोलवले. अंगझडतीत त्याच्याकडे कमरेला लावलेले पिस्तूल मिळाले. पारळे यांनी पिस्तूल जप्त करून याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक अनिकेत कुंडले यांनी तातडीने पोहोचून नरके याला ताब्यात घेतले. मनाई आदेशाचा भंग करून पिस्तूल घेऊन न्यायालयात गेल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनाही शस्त्र बाहेर ठेवावे लागतेन्यायालयात कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणि ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नसते. सुनावणीसाठी जाणारे पोलिसही त्यांच्याकडील शस्त्र बाहेर जमा करून आत जातात. कमरेला पिस्तूल लावून पक्षकार थेट कोर्ट रूममध्ये पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परवाना रद्द होणारनरके याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्याने २०२२ मध्ये घेतलेल्या शस्त्र परवान्याची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत आहे. शस्त्र परवान्याच्या अटी आणि नियमांचा भंग केल्याने त्याचा परवाना रद्द व्हावा, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.