राजू शेट्टींची अवस्था म्हणजे सेना गेलेले पती: पाशा पटेल यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:32 IST2021-02-09T18:29:11+5:302021-02-09T18:32:16+5:30
Raju Shetty Pasha patel Kolhapur- कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती अशी अवस्था असून त्यांच्या मागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

राजू शेट्टींची अवस्था म्हणजे सेना गेलेले पती: पाशा पटेल यांची टीका
कोल्हापूर : कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती अशी अवस्था असून त्यांच्या मागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.
बांबू शेती लागवडीबाबत पटेल संपुर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत आहेत, मंगळवारी ते कोल्हापूरात आले होते. पटेल म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांनी दोन महिने आंदोलन करून काय पदरात पाडून घेतले. केवळ विरोधाला विरोध करणे एवढाचा कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील ४० टक्के शेती ही करार पध्दतीनेच केली जाते. हा कायदाही ऐच्छिक आहे, मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.
यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भगवान काटे, विजय जाधव आदी उपस्थित होते.
मग पवार गैरहजर का?
स्वताला शेतकऱ्यांचा आत्मा समजणारे शरद पवार शेतकरी विद्येयकावेळी राज्यसभेत का उपस्थित नव्हते. आता मात्र दुहेरी भूमिका घेऊन राजकारण सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.