शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शेट्टी-हाळवणकरांना यंत्रमागधारकांचा घेराव

By admin | Updated: April 29, 2017 01:09 IST

शेट्टी-हाळवणकरांना यंत्रमागधारकांचा घेराव

इचलकरंजी : तलेसरा दिवाळे प्रकरणामध्ये यंत्रमागधारकांची अडकलेली रक्कम १00 टक्के वसूल व्हावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. तसेच बालोत्रा येथे प्रत्यक्ष भेट देऊन कारखानदारांची बाजू मांडण्यात येईल आणि प्रसंगी रक्कम परत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचा पुनरुच्चार खासदार राजू शेट्टी यांनी केला.शहरातील हत्ती चौकामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार हाळवणकर, खासदार शेट्टी शुक्रवारी सायंकाळी आले होते. त्यावेळी तलेसरा दिवाळखोरी प्रकरणामध्ये अडकलेल्या यंत्रमाग कारखानदारांच्या नातलग महिला व यंत्रमागधारकांनी या दोघांनाही घेराव घातला आणि त्यांच्यासमोर या प्रकरणाची कैफियत मांडली. त्यावेळी वरीलप्रमाणे दोघांनी आश्वासन दिले.दरम्यान, आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, विटा पॉवरलूम असोसिएशनचे प्रमोद किरण तारळेकर, दत्तोपंत चोथे, पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्किरे, श्रीशैल कित्तुरे, आदींसह पॉपलीन उत्पादक कारखानदारांकडून वस्तुस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी बोलताना आमदार हाळवणकर यांनी यंत्रमागधारकांच्या कापडाची रक्कम १00 टक्के वसुली करण्याची ग्वाही दिली. तसेच खासदार शेट्टी यांनी सुद्धा यंत्रमागधारकांच्या नातलग महिला व यंत्रमागधारक यांच्याकडून माहिती घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा तपशील सांगितला. तसेच आठवडाभरानंतर बालोत्रा येथे प्रत्यक्ष जाऊन यंत्रमागधारकांना त्यांची रक्कम मिळावी, यासाठी संघर्ष करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)श्रीकांत तलेसरांची प्रथमच प्रत्यक्ष भेटबालोत्रा येथे तलेसरा प्रकरणात अन्यायग्रस्त कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून कैस बागवान, शैलेश डोईजड, तुकाराम साळुंखे, दीपक यळरुटे, दिलीप कांबळे हे अद्यापही तळ ठोकून आहेत. हे प्रकरण घडल्यापासून प्रथमच शुक्रवारी तलेसरा बंधूपैकी श्रीकांत तलेसरा याने या प्रतिनिधींची भेट घेतली आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेत यंत्रमागधारकांची काही रक्कम देण्याचे त्याने कबूल केल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्षात अडकलेल्या रकमेपैकी श्रीकांत याच्याकडून देण्यात येणारी रक्कम अल्प असल्यामुळे या प्रतिनिधींनी शंभर टक्के रक्कम परत देण्याचा आग्रह कायम ठेवला आहे.