लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी शेकापची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:37 IST2020-10-23T19:32:55+5:302020-10-23T19:37:36+5:30

लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा, या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. बिल वसुलीसाठी सक्ती केली तर महावितरणविरोधात संघर्ष सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Shekap protests for electricity bill waiver during lockdown period | लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी शेकापची निदर्शने

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी शेकापची निदर्शने

ठळक मुद्दे लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी शेकापची निदर्शने

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा, या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. बिल वसुलीसाठी सक्ती केली तर महावितरणविरोधात संघर्ष सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि लोकांच्या हातचे काम गेले. तीन-साडे तीन महिने लोक घराबाहेर पडले नाहीत. अनेकांचे रोजगार गेल्याने जगणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत महावितरणने दिलासा देण्याऐवजी भरमसाट बिले वाढवून ग्राहकांना झटका दिला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी पैसे भरलेले नाहीत आणि आता महावितरणने वसुलीचा तगादा लावला आहे. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले असून संपूर्ण वीज बिल माफ करा अन्यथा संघर्षास तयार राहा, असा इशारा शेकापचे चिटणीस बाबूराव कदम यांनी दिला.

यावेळी दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, मोेहन पाटील, ॲड. उज्ज्वला कदम, सुभाष सावंत, महेश चव्हाण, अस्लम बागवान, आशिष चिले, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Shekap protests for electricity bill waiver during lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.