शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:27 IST

संचालकांची मते घेतली जाणून : शुक्रवारी बंद पाकिटातून नाव सभास्थळी जाणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीबाबत सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या नेत्यांच्या बैठकीत शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शुक्रवारी (दि. ३०) बंद पाकिटातून हेच नाव संचालक मंडळाच्या निवड सभेत पाठवले जाणार आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय काेरे, माजी आमदार संजय घाटगे हे उपस्थित हाेते. या चार नेत्यांमध्ये बंद खोलीत अध्यक्ष पदाच्या नावासह आगामी निवडणुकीबाबत रणनीती चर्चा झाली. त्यानंतर आमदार कोरे, घाटगे बैठकीतून बाहेर पडले. मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांनी संचालकांशी चर्चा करून शुक्रवारी नावाचे बंद पाकीट पाठवून देतो, ते संचालक मंडळ बैठकीच्या अगोदर उघडण्याची सूचना केली.

पाच संचालक अनुपस्थितसत्तारूढ गटाचे संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे व नवीद मुश्रीफ हे बैठकीला उपस्थित नव्हते. डोंगळे यांच्या बाबत विचारले असता, ते शनिच्या दर्शनाला गेल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, विरोधी गटाचे शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, डॉ. चेतन नरके असे पाच संचालक अनुपस्थितीत होते.

यड्रावकरांनी व्यक्त केली नाराजीगोकुळ’च्या निवडणुकीवेळी शाहू आघाडीमध्ये आम्ही होतो, पण सोमवारच्या बैठकीला आम्हाला बोलवले का नाही? अशी विचारणा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एका संचालकांना फोन करून केली.

पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चापालकमंत्री प्रकाश आबीटकर हे सोमवारी सायंकाळी सव्वासहापर्यंत जिल्हा परिषदेच्या आढावा बैठक व नागरिकांच्या गाठीभेटीत होते. पण, हाकेच्या अंतरावरील शासकीय विश्रामगृहातील बैठकीला ते गेले नाहीत. त्यांच्यासह माजी खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, राजेश पाटील हेही बैठकीला उपस्थित नव्हते. यापैकी नरके देवदर्शनासाठी, तर के. पी. पाटील हे आजारी असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील मदर डेअरी जागा घेणारसंघाची मुंबईतील दुधाची वाढती मागणी पाहून तिथे पॅकींग सेंटर विस्तारण्यासाठी जागेची गरज आहे. तिथेच मदर डेअरीची जागा द्यायची आहे, याबाबत मंत्री हसन मुश्रीफ हे ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष मिनेश शाह यांच्याशी फोनवरून बोलले. अध्यक्ष निवडीनंतर मुंबईसह पुण्यातील जागेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबतच्या सोमवारच्या बैठकीची मला कल्पना नव्हती किंवा कोणाचा निरोपही नव्हता. - आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारण