शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: 'देशात ईडीचा वापर, तुमची देशाला गरज, राजीनाम्यावर विचार करा'; मोठ्या बहिणीची शरद पवारांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:18 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली. राजीनाम्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्या मोठ्या बहिण सरोज पाटील यांनीही प्रतिक्रिया देत राजीनामा पाठिमागे घेण्याची मागणी केला आहे. 

शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

सरोज पाटील म्हणाल्या, आता मी दुपारी अतिशय दु:खदायक बातमी ऐकली आणि मला धक्का बसला. देशात अराजकता माजली आहे, लोकशाही  जगते की नाही असा प्रश्न आहे. अतिशय अस्वस्थ वातावरण असताना शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील लोकांना हा निर्णय पचेना झाला आहे. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, सध्या देशात संविधान पायदळी तुडवले जात आहे. ईडीचा वापर होत आहेत. त्यामुळे अशा काळात शरद पवार यांची देशाला गरज आहे. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, शरद पवार यांनी विरोधकांना कधीही वाईट शब्दात उत्तर दिलेलं नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याच मला दु:ख वाटत आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी सरोज पाटील यांनी केली.   (Maharashtra politics)

"आता त्यांची बाजू सांगते शरद पवार म्हणतात मी बरेच वर्ष खुर्चीवर बसलो. माझी प्रकृती साथ देत नाही, वय वाढत आहे. पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे, हे सगळ बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्यासारखे पर्यायी नेतृत्व तयार करा आणि मग खुर्ची सोडा, अजुनही आमच्यासमोर तुमच्यासारखा नेता दिसत नाही, असंही सरोज पाटील म्हणाल्या. 

'महाराष्ट्राच खूप नुकसान होईल. राष्ट्रवादी (NCP) पक्ष दुबळा होईल. लोक खूप अवस्थ झाले आहेत. मला राज्यभरातून अनेक लोकांचे फोन आले आहेत. लोकांच्या भावना ओळखाव्यात आणि राजीनामा परत घ्यावा. पण, दुसरीकडे आम्हाला तो हवा आहे, आमचा तो भाऊ आहे. त्याची प्रकृती चांगली पाहिजे. हाही आमचा स्वार्थ आहे. यामुळे या राजीनाम्यावर शरद पवार यांनी विचार करावा असं मला वाटतं, अशी भावनिक साद सरोज पाटील यांनी घातली.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार