शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही - : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:46 IST

चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देएका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.

कोल्हापूर : ‘शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. डोक्यात खूप काही चालू असतं. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पेटाळा आणि शाहू स्मारक भवन येथे आयोजित मेळाव्यांमध्ये ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करीत बंडखोरांनाही इशारा दिला.

पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की, मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल; पण तसे होणार नाही. मी परवा येऊन प्रकाश आबिटकर यांचा अर्ज दाखल करून गेलो. आत्ता आलोय. अमित शहा यांच्याबरोबर रविवारी येणार आहे. नंतर सांगली, सातारा जिल्ह्यांतील सभा आहेत. त्यामुळे मी कोथरूडमध्ये अडकलो नाही. मी उच्चांकी मतांनी निवडून येणार आहे. मी निवडणूक युद्ध म्हणूनच लढतो. त्यामुळे कोथरूडमध्ये शेवटचे मत पडेपर्यंत मी थांबणार आहे.

पक्षाचे आणि युतीचे कार्य यांकडे मी धर्मकार्य म्हणून पाहतो. मला अहंकार नाही. मी संदीप देसार्इंच्या घरीही जाईन; परंतु त्यांनी जे चालले आहे ते थांबवावे. लोकसभेला माझ्याविरोधात कंड्या पिकविल्या गेल्या; परंतु प्रामणिकपणाने काम केले म्हणूनच संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य मिळाले. आताही राजेश क्षीरसागर यांना विजयी करून हॅट्ट्रिक करूया.

राजेश क्षीरसागर म्हणाले, प्रचंड विकासकामे केली, रस्त्यावरील चळवळी केल्या, सामाजिक कामे उभारली, विधानसभेत प्रश्न मांडले. ज्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या मानगुटीवर टोलचे भूत आणून बसवले होते, तो टोल रद्द करण्यासाठी आक्रमक आंदोलन केले. ३० वर्षे असलेल्या युतीची जाणीव ठेवत भाजपचे कार्यकर्ते माझ्यासाठी राबतील असा विश्वास आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे भाग्य आम्हांला चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मिळाले. त्यांचा आदेश मानून आम्ही काम करणार आहोत. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधी उमेदवाराला संबोधलेले ‘घोसाळकर रिटर्न’ हे शब्द जनताच खरे करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, उदय पवार,नंदकुमार मोरे, बाबा पार्टे, नगरसेवक राहुल चव्हाण, आर. डी. पाटील, अशोक जाधव, रवी चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.जखम बरी झाली नाही तर हात काढावा लागतोपाटील म्हणाले, हाताला जखम झाली तर सुरुवातीला मलम, गोळ्या दिल्या जातात; परंतु अशी वेळ येते की हात काढावाच लागतो. त्यामुळे सुरुवातीला विरोधी काम करणाऱ्यांना समजून सांगू. तरीही आडमुठेपणा सुरूच ठेवला तर मात्र कारवाई अटळ आहे.हिंदुत्ववादी मतदारसंघ कॉँग्रेसच्या ताब्यात देऊ नकापाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे. तो कॉँग्रेसच्या हातात देऊ नका. ज्यांनी कॉँग्रेसची सभासदत्वाची पावतीही फाडली नाही, घरात दोन भाजपचे नगरसेवक आहेत, अशांनी संधी मिळतेय म्हणून कॉँग्रेसची उमेदवारी घेतली. परंतु ज्या कॉँग्रेसला स्वत:चा जिल्हाध्यक्ष टिकवता आला नाही, त्या मरणप्राय झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राणवायू फुंकु नका.संजय घाटगेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेटमेळाव्यानंतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कागलचे शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी भेट घेतली. या मतदारसंघात तुम्ही एक-दोन सभा घ्याव्यात, अशी विनंती घाटगे यांनी पाटील यांना केली. त्यावर पालकमंत्र्यांनी सभेसाठी तारीख देतो, असे सांगितले. सध्या कागल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय घाटगे असताना त्या ठिकाणी भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाठबळ आपल्यासोबत आहे, याचा संदेश देण्यासाठी घाटगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मंडलिकांनी सोयीचे राजकारण थांबवावेआम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, भलेभलेही आम्हाला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे. कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक