जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:48 IST2020-09-22T19:44:17+5:302020-09-22T19:48:36+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली.

जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली.
मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दूरध्वनी करून मंत्री मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
जनतेला तुमची गरज आहे.......
शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रकृतीबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत राज्यातील जनतेला तुमची गरज आहे. त्यामुळे लवकर बरे व्हा आणि लवकर बाहेर पडा, अशा सदिच्छाही दिल्या.