शरद इंजिनिअरिंगची हॅट् ट्रिक (हॅट् ट्रिक शब्द जोडून घ्यावा. होत नाही)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:41+5:302021-06-09T04:30:41+5:30
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२१ अंतर्गत ...

शरद इंजिनिअरिंगची हॅट् ट्रिक (हॅट् ट्रिक शब्द जोडून घ्यावा. होत नाही)
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२१ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवाजी विद्यापीठ, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमध्ये इन्स्टिट्यूटने सलग तिस-या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत हॅटट्रिक साधली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आॅनलाइन झाली. स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभासाठी देवदत्त जोशी, मीनल पटेल, डॉ. सरिता बाळशेतवार, प्रा. निर्भय विस्पुते, धनंजय भटाले उपस्थित होते.
स्पर्धेसाठी महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकमधून १५० पेक्षा अधिक प्रोजेक्ट व ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संयोजकांनी विविध विभागातील आठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्यांची निवड केली.
शरद इन्स्टिट्यूटमधील संकेत बापट, रोहित दायमा, अभिषेक भगाटे व श्रद्धा महाडिक या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट आॅफ आय.ओ.टी. बेस्ड व्हॅक्सिन स्टोअरेज अॅण्ड ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम' हा प्रकल्प वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या निर्देशनानुसार लस २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागते. चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जगभरामध्ये २५ टक्के तर भारतात ४० टक्के लसींचे नुकसान होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठे नुकसान सोसावे लागते.
या सिस्टीममध्ये थर्मल एनर्जी स्टोअरेजचा वापर करून इनआॅरगॅनिक आणि युटेक्टिक हे फेजचेंज मटेरिअल वापरले आहे. ज्यामुळे वीज नसतानाही पुढील सहा तास तापमान नियंत्रणात ठेवता येते. प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखालील या संशोधन प्रकल्पाला प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, डॉ. पी. एम. भागवत यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.