गोकूळ निवडणुकीत शाहू विकास आघाडीसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:37+5:302021-04-05T04:21:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत असून हातकणंगले तालुक्यातून जास्तीत ...

With Shahu Vikas Aghadi in Gokul elections | गोकूळ निवडणुकीत शाहू विकास आघाडीसोबत

गोकूळ निवडणुकीत शाहू विकास आघाडीसोबत

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत असून हातकणंगले तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्नशील असतील, असे आश्वासन आमदार राजू आवळे यांनी दिले. इचलकरंजी येथे गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार राजू आवळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे जिल्ह्यात पूरक वातावरण असल्यामुळे आघाडीला नक्की यश मिळेल, असा विश्वास आवळे यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे, प्रकाश पाटील, राष्ट्रीय कॉंग्रेसचे शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : इचलकरंजी येथे

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकूळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी आमदार राजू आवळे, मदन कारंडे, प्रकाश पाटील, शशांक बावचकर, संजय कांबळे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

०४ आवळे सतेज पाटील

Web Title: With Shahu Vikas Aghadi in Gokul elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.