शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 12:05 IST

तुम्ही आता एका पक्षाचे झालात

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांच्याबद्दल आम्हांला आदरच आहे. परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले. त्यामुळे ते वादात ओढले जाणार हे उघड होते. म्हणूनच मी त्यांनी राजकारणात येऊ नये अशी विनंती केली होती. अजूनही अर्ज भरायला वेळ आहे. त्यांनी उमेदवारीचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिला.भाजपच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका करणारे ‘दादा उठा,’ ‘दादा उठा’ यासारखे व्हिडीओ जेव्हा पडायला सुरुवात झाली, तेव्हाच याला उत्तरे दिली जाणार आणि वाद वाढणार, हे आम्हांला माहिती होते. खरोखरच जर शाहू छत्रपतींविषयी प्रेम होते तर त्यांना सन्मानाने राज्यसभा द्यायला हवी होती. संभाजीराजेंनाही खासदार केलेच होते की. त्यामुळे आता या विषयावर पडदा टाकला जावा.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘आमचं ठरलंय,’जनतेचं ठरलंय’ असं म्हणत ह्यांचं जे ठरलेलं असतंय ते जनतेवर लादायचं काम सुरू आहे. अनेक वर्षे आमदार, मंत्री असताना आणि अनेक संस्था ताब्यात असताना कोल्हापूरसाठी यांनी काही केलं नाही. हे अपयश लपवण्यासाठी त्यांचे हे सगळं सुरू असतंय. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांची भाषणे झाली.

माझं म्हणणं चुकलं तर माफी मागेनसंजय मंडलिक म्हणाले, मी शाहू छत्रपती यांच्याबद्दल बोलताना ‘थेट’ हा शब्द न वापरण्याची चूक केली. ते थेट वारसदार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माझा महाराजांना प्रश्न आहे की तुम्ही दत्तक आहात की नाही, दत्तकची डायरी केली की नाही. हे माझं म्हणणं चुकलं तर मी माफी मागेन.

आमचं ठरलंयचे लचांडकोल्हापुरात एक नवा गोबेल्स जन्माला आलाय. ‘आमचं ठरलंय’ हे एक नवीन लचांड आम्ही अंगावर घेतलं त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यातच बराच काळ गेला. त्यांचा पैरा फेडण्यासाठी का असेन ‘दक्षिण’साठी मोठा निधी दिला.

गप्प बसणार नाहीशौमिका महाडिक म्हणाल्या, ही लोकसभेची निवडणूक आहे. दक्षिणमध्ये जर महाडिक-पाटील अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला तर मीही गप्प बसणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Hasan Mushrifहसन मुश्रीफShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती