शाहू सडोली, शाहू विद्यानिकेतनला अजिंक्यपद

By Admin | Updated: November 17, 2015 01:01 IST2015-11-17T00:54:04+5:302015-11-17T01:01:14+5:30

कुमार गट जिल्हा अजिंक्यपद, निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

Shahu Sadoli, Shahu Vidyaniketan's championship | शाहू सडोली, शाहू विद्यानिकेतनला अजिंक्यपद

शाहू सडोली, शाहू विद्यानिकेतनला अजिंक्यपद

इचलकरंजी : येथील जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या कुमार गट जिल्हा अजिंंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शाहू सडोली संघाने, तर मुलींच्या गटात राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन संघाने अजिंंक्यपद पटकाविले.कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळाच्यावतीने दोन दिवस कुमार गट (मुले-मुली) जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पार पडली. कै. मल्हारराव बावचकर क्रीडानगरीत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल ६० संघ सहभागी झाले होते. बाद पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात शाहू सडोली, जय हनुमान बाचणी, छावा शिरोली व राष्ट्रसेवक तळसंदे या संघांनी दमदार कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात डायनॅमिक स्पोर्टस्, जयहिंद मंडळ, राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन व महालक्ष्मी कोल्हापूर या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात शाहू सडोली विरुद्ध जय हनुमान यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीत शाहू सडोलीने ३४ गुण मिळवत जय हनुमान (११) संघाचा २३ गुणांनी पराभव केला, तर छावा (२२) विरुद्ध राष्ट्रसेवक (१८) यांच्यातील रंगतदार लढतीत छावाने ४ गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत मुलांच्या गटात शाहू विरुद्ध छावा यांच्यात रंगतदार सामना होऊन शाहूने २८ गुण मिळवून छावा (१०) संघावर १८ गुणांनी विजय प्राप्त करून अजिंक्यपद मिळविले.
मुलींच्या गटात डायनॅमिक स्पोर्टस् (२४) विरुद्ध जयहिंद मंडळ (१८) यांच्यातील लढत डायनॅमिकने ६ गुणांनी आणि रा. शाहू विद्यानिकेतन (३४) विरुद्ध महालक्ष्मी (२८) यांच्यातील लढत विद्यानिकेतनने जिंकून अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत डायनॅमिक विरुद्ध रा. शाहू विद्यानिकेतन यांच्यातील लढतीत विद्यानिकेतनने ३१ आणि डायनॅमिकने २२ गुण मिळवले. ९ गुणांसह विद्यानिकेतनचा संघ अंतिम विजेता ठरला. स्पर्धेनंतर विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या, उपाध्यक्ष बजरंग वडिंगे, कार्यवाह उदय चव्हाण, नगरसेवक अजित जाधव, तानाजी पोवार, मदन झोरे, बाळासाहेब कलागते, शिक्षण मंडळ सभापती राजू हणबर यांच्यासह पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Shahu Sadoli, Shahu Vidyaniketan's championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.