कोडोली येथे शाहू जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST2021-06-27T04:16:50+5:302021-06-27T04:16:50+5:30

कोडोली : कोडोली येथे विविध ठिकाणी राजर्षी छ. शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन ...

Shahu Jayanti celebrations at Kodoli | कोडोली येथे शाहू जयंती उत्साहात

कोडोली येथे शाहू जयंती उत्साहात

कोडोली : कोडोली येथे विविध ठिकाणी राजर्षी छ. शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामसेवक ए. वाय. कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरीक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यशवंत आयुर्वेद महाविद्यालयात डॉ. सूर्यकिरण वाघ व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करणेत आले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करणेत आले. अभिजित बनसोडे, आबा नरेश कांबळे, देवा नितीन पांढरे, भावड्या पोवार आदी जण उपस्थित होते. यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करणेत आले.

Web Title: Shahu Jayanti celebrations at Kodoli