बालकल्याण संकुलात शाहू जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:03+5:302021-06-28T04:17:03+5:30
फोटो (२७०६२०२१-कोल-बालकल्याण संकुल फोटो) : कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ...

बालकल्याण संकुलात शाहू जयंती साजरी
फोटो (२७०६२०२१-कोल-बालकल्याण संकुल फोटो) : कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पद्मजा तिवले, पी. के. डवरी आदी उपस्थित होते.
खादी ग्रामोद्योग संघातर्फे जयंती साजरी
कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना, सर्वोदय मंडळाच्यावतीने खादी ग्रामोद्योग संघात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी प्राचार्य व्ही. डी. माने होते. देसाई, माने, दादासोा जगताप, सदाशिव मनुगडे, एस. एस. तुपद, एस. व्ही. सुतार, विष्णूपंत अंबपकर, अप्पासाहेब देसाई, पी. के. पाटील, डी. डी. चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गीता गुरव, छाया भोसले, छाया रेंदाळकर, संदीप शिंगे, सविता देसाई, सुजय देसाई, आर. डी. पाटील, अरूण मांगुरे, हिंदूराव पवार, गणेश ओतारी, पंढरीनाथ शिंदे, मिलिंद चौगुले उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.