महापुरे, भोजे, विनय पाटील यांना शाहू पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:55+5:302021-06-25T04:17:55+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाहू पुरस्कारांची घोषणा माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. सत्तारूढ ...

Shahu award announced to Mahapure, Bhoje, Vinay Patil | महापुरे, भोजे, विनय पाटील यांना शाहू पुरस्कार जाहीर

महापुरे, भोजे, विनय पाटील यांना शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाहू पुरस्कारांची घोषणा माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. सत्तारूढ महाविकास आघाडीच्या चौघांना तर विरोधी भाजप, जनसुराज्यचे तीन सदस्य पुरस्काराचे मानकरी ठरले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.

शिल्पा चेतन पाटील करवीर, विनय राजेंद्र पाटील राधानगरी, शिवानी भोसले कागल, विशांत महापुरे पन्हाळा, विजय भोजे शिरोळ, कल्पना चौगले पन्हाळा आणि कागल पंचायत समितीच्या सभापती पूनम मगदूम यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १५ सदस्यांचे या पुरस्कारासाठी अर्ज आले होते. त्यातून सात जणांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासणे, राजेश पाटील यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे कामकाज पाहून त्यांना पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, जनसुराज्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याला पुरस्कार देण्यात आला आहे.

२४०६२०२१ कोल शिल्पा पाटील

२४०६२०२१ कोल विनय पाटील

२४०६२०२१ कोल शिवानी भोसले

२४०६२०२१ कोल विशांत महापूरे

२४०६२०२१ कोल विजय भोजे

२४०६२०२१ कोल कल्पना चौगले

२४०६२०२१ कोल पूनम मगदूम

Web Title: Shahu award announced to Mahapure, Bhoje, Vinay Patil