शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Zero Shadow Day : सावलीने सोडली पन्नास सेकंदासाठी सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 6:50 PM

Zero Shadow Day : नेहमी आपल्या सोबतीला असणाऱ्या सावलीने आज, गुरुवारी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडली. कोल्हापूरकरांनी हा अनुभव आज घेतला. हा चमत्कार घडला याला कारण होते, शून्य सावली दिवस. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. शून्य सावलीचा अनुभव घेतल्याचा स्टेटस अनेकांच्या व्हॉटस् अ‍ॅपचा स्टेटस बनला होता.

ठळक मुद्देसावलीने सोडली पन्नास सेकंदासाठी सोबत कोल्हापूरकरांनी भरदुपारी घेतला अनुभव

कोल्हापूर : नेहमी आपल्या सोबतीला असणाऱ्या सावलीने आज, गुरुवारी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडली. कोल्हापूरकरांनी हा अनुभव आज घेतला. हा चमत्कार घडला याला कारण होते, शून्य सावली दिवस. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. शून्य सावलीचा अनुभव घेतल्याचा स्टेटस अनेकांच्या व्हॉटस् अ‍ॅपचा स्टेटस बनला होता.कोरोनाच्या प्रसारामुळे हौशी कोल्हापूरकर खगोलप्रेमींनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भरदुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला. कोल्हापूर शहरातील अनेक खगोलप्रेमींनी आज, गुरुवारी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटापर्यंत जवळपास ५० सेकंद सावली गायब झाल्याची प्रचीती घेतली. यामध्ये खगोलप्रेमी डॉ. राजेंद्र भस्मे, किरण गवळी, डॉ. अविराज जत्राटकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांचा समावेश आहे. डॉ. व्हटकर यांनी आपल्या निवासस्थानी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.२९ मिनिटांनी २३.५ ते -२३.५ या अक्षांशामध्ये या शून्य सावलीच्या क्षणांचा अनुभव घेतला. या वेळी सावली बरोबर त्यांच्या पायात होती, असे त्यांनी सांगितले. ह्या वेळेला सूर्य बरोबर माथ्यावर होता आणि त्याची किरणेहि लंबरुप पडली होती.पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्याने वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो. या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर पडतात. त्यामुळे विषुववृत्तावर कुठेही उभा राहिले तरी सावली काही काळासाठी नाहीशी होते.तीन महिन्यांनी मकरवृत्तावर, तीन महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणिपरत तीन महिन्यांनी कर्कवृत्तावर शून्य सावली दिसते; मात्र कर्कवृत्त,विषुववृत्त या स्थानांमध्ये सूर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखावृत्तावर पडतील या ठिकाणी असणाऱ्या जागांवर काही सेकंदाकरिता सावली अदश्य झाली.नांदणीत सावलवडे यांनी केला वेगळा प्रयोगशिरोळ तालुक्यातील नांदणी येथील खगोल अभ्यासक प्रा.भारत सावलवडे यांनी काही वेगळे प्रयोग केले. त्यांन आपल्या घराच्या गच्चीत प्रत्यक्ष शून्य सावली कशी पहायची याचा प्रयोग १२.२१ वाजल्यापासून १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अनुभवला. त्यांनी पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पातळीवर मोबाईल,होकायंत्र, काचेचा ग्लास, झाकण, दोन काचेच्या ग्लासवर एक आडवी काच आणि त्यावरील दोन्ही ग्लासच्या मध्यभागी नाणे ठेवून हा प्रयोग केला. १२ वाजून २१ मिनिटांपासून सावली हळूहळू दूर जात होती.जवळजवळ सात मिनिटे सावलवडे यांनी निरिक्षणे नोंदवली. मात्र सूर्य दक्षिणेलाच राहिल्याने सावली पूर्णपणे गायब झालेली नव्हती.शून्य सावलीचा आज पुन्हा अनुभव घेता येणारमहाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विविध दिवशी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. कोल्हापुरात उद्या, पुन्हा दि. ७ मे रोजी शून्य सावली  दिवसाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रा. भारत सावलवडे यांनी दिली. 

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसkolhapurकोल्हापूर