CoronaVirus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 19:20 IST2020-06-05T19:19:19+5:302020-06-05T19:20:38+5:30

जिल्ह्यातील कोरोनाचा सातवा बळी शुक्रवारी नोंदवला गेला. शुक्रवारी संध्याकाळी आजरा तालुक्यातील मेंढोली गावच्या ८० वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना इतरही काही आजार असल्याचे सांगण्यात आले.

Seventh victim of corona in Kolhapur district | CoronaVirus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

CoronaVirus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळीमेंढोली गावच्या ८० वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर :  जिल्ह्यातील कोरोनाचा सातवा बळी शुक्रवारी नोंदवला गेला. शुक्रवारी संध्याकाळी आजरा तालुक्यातील मेंढोली गावच्या ८० वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना इतरही काही आजार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित व्यक्ती पंधरवड्यापूर्वी मुंबईहून आली होती. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना अधिक त्रास होवू लागल्याने कोल्हापूरला सीपीआरला आणले जात असताना अधिकच त्रास होवू लागल्याने त्यांना पुन्हा आजरा येथील कोव्हिड सेंटरला नेण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ६५३ नोंद झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ४०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात आणखी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत कोरोना रूग्णांची संख्या ६५९ झाली आहे. सध्या २५३ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Seventh victim of corona in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.