केएमटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:13+5:302021-02-05T07:09:13+5:30
कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवार(दि. १)पर्यंत प्रशासनाने पाठवावा, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव ...

केएमटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग
कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवार(दि. १)पर्यंत प्रशासनाने पाठवावा, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केल्या. शुक्रवारी केएमटी वर्कशॉपमध्ये केएमटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, उपायुक्त रविकांत अडसूळ, चेतन कोंडे, केएमटी कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक यांची प्रमुख उपस्थित होती.
केएमटी कर्मचारी संघटना आणि माजी नगरसेवक अनिल कदम यांनी महापालिकेप्रमाणे केएमटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. प्रत्येक महिन्यांचा पगार १०० टक्के करावा, आतापर्यंत २५ टक्के कपात केलेली रक्कम मिळावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, तोट्यातील मार्ग बंद करणे यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, केएमटीचे पी. एन. गुरव, संजय इनामदार, अरुण केसरकर, आदी उपस्थित होते.