शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्थ अखेर व्यर्थ, दुर्मीळ आजाराने ओवी'ची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:29 IST

थेट थायलंडला जाऊन महागडे औषध आणले, हातकणंगले येथील गुरव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

कोल्हापूर : दुर्मीळ एसएसपीई (सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस) या आजाराने गाठलेल्या सात वर्षीय ओवीला वाचविण्याची तिच्या वडिलांची शर्थ अखेर व्यर्थ ठरली. वडील सागर पुजारी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. थेट थायलंडला जाऊन महागडे औषध आणले. कोल्हापूरकरांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ओवीला वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. मात्र, आजार बळावल्याने रविवारी (दि. २५) दुपारी ओवीने खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि मुलीला वाचविण्याची धडपड करणाऱ्या गुरव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.हातकणंगले येथील गुरव कुटुंबातील चैतन्याचा झरा असलेली ओवी संपूर्ण कुटुंबाची लाडकी होती. सहा महिन्यांपूर्वी फिट आल्याने वडिलांनी तिच्यावर गावातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पुन्हा-पुन्हा हा त्रास होत असल्याने त्यांनी मुलीला कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून अनेक तपासण्या केल्या. त्यानंतर ओवीला दुर्मीळ एसएसपीई विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.या आजारावर जगात कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील हतबल झाले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. डॉक्टरांच्या मदतीने गुगलवर शोध घेऊन आजार आणि उपचाराची माहिती घेतली. चीनमधील एक औषध थायलंडमध्ये उपलब्ध असल्याचे समजताच त्यांनी थेट थायलंड गाठले. महागडे औषध आणून त्यांनी मुलीवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवले.पण, नियतीचा फेरा एवढ्यावरच थांबणारा नव्हता. उपचारासाठी पैशांची तजविज करणेही तितकेच महत्त्वाचे होते. यासाठी त्यांनी दानशूर कोल्हापूरकरांना साद घातली. त्यातून सुमारे लाखाची मदत जमा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोलाची मदत केली. पण, हसत्या-खेळत्या ओवीचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही मदतजयसिंगपूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ओवीच्या आजाराची वार्ता पोहोचली. त्यांनी दहा लाखांची मदत केली. या मदतीमुळे ओवीचा जीव वाचेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी अचानक ओवीची तब्येत बिघडली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल