शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार; ५४ वर्षांच्या नराधामास २० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 6:50 PM

Court Kolhapur : खीर पिण्यासाठी देतो असे सांगून घरी नेऊन नातीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मोहम्मद रफीक शेख (वय ५४, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) याला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी दोषी ठरवले, त्याला २० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सहायक सरकारी वकील ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.

ठळक मुद्देसात वर्षांच्या मुलीवर अत्याचार; ५४ वर्षांच्या नराधामास २० वर्षे कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय : खीर पिण्याचे आमिष दाखवून केले गैरकृत्य

कोल्हापूर : खीर पिण्यासाठी देतो असे सांगून घरी नेऊन नातीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मोहम्मद रफीक शेख (वय ५४, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) याला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी दोषी ठरवले, त्याला २० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सहायक सरकारी वकील ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, ३०सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका ७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस खीर पिण्याचे आमिष दाखवून तिला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला होता. घटनेवेळी जागरुक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी आरोपी मोहम्मद शेख याला रंगेहाथ पकडून त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली होती. तसेच त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास करून एम. आर. मोरे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.खटल्यात सात साक्षीदार तपासले. साक्षीदाराची साक्ष, सीपीआरचे वैद्यकीय अधिका-याची साक्ष तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य माणून प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवले. त्यानुसार आरोपी मोहम्मद शेख याला २० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, दंड न भरल्यास आरोपीस आणखी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.दरम्यान, आरोपीकडून जमा होणा-या दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, पोलीस नाईक जे. एस. खाडे, हरीश सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर