शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

स्वच्छतेसाठी सातवेळा भारत भ्रमण

By admin | Updated: November 16, 2015 00:37 IST

भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.

पाली : भारतातील सर्व राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, वनसंपदा वाढून पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेसाठी जनजागृती, एडस्वर प्रबोधन कार्यक्रम या चतुसूत्री सामाजिक उपक्रमासाठी संपूर्ण भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.आज सिबाप्रसाद दास हा सायकलने भ्रमंती करत गोवा येथे जात असताना पाली येथे थांबून त्याने सामाजिक संदेश, मार्गदर्शन व प्रबोधन केले. यावेळी त्याचे स्वागत उपसरपंच मंगेश पांचाळ, बीट शिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे, नामदेव हितवर्धक संघाचे अध्यक्ष योगेश हिरवे, डॉ. उमेश पेठकर, अ‍ॅड. सागर पाखरे यांनी करुन निवास व्यवस्थाही केली.यावेळी दास याने सांगितले की, मी आतापर्यंत ७वेळा भारतातील सर्व राज्यांचा सायकलने सामाजिक प्रबोधनासाठी प्रवास केला असून, राज्यांमध्ये त्या ठिकाणच्या रोटरी, लायन्स क्लब, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, मार्गदर्शन याविषयीचे कार्यक्रम नि:शुल्क करत आहे. या चालू ८व्या देशव्यापी दौऱ्याची सुरुवात १५ आॅगस्ट २०१४ रोजी ओरिसामधून केली असून, तो १५ आॅगस्ट २०१६ रोजी ओरिसामध्येच समाप्त होणार आहे.तसेच सध्या भारतामध्ये सीमावर्ती राज्यांमध्ये नक्षलवादाचे प्रमाण वाढत असून, ते रोखण्यासाठी शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांतीचा संदेश देणे आवश्यक आहे. तसेच सध्या भारतातील सर्वच राज्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हासही चिंताजनक पातळीवर जाऊन पोहोचल्याने वनसंपदा संवर्धन व वृक्षलागवडसाठीही प्रबोधन करत आहे. तसेच देशामध्ये एचआयव्ही विषाणुंमुळे एडस्चे प्रमाणही वाढत आहे. त्याकरिता एडस्बाबत जनजागृती करत आहे, असे ते म्हणाले.आपण स्वत: अविवाहित असून, सर्व आयुष्य हे समाज सेवेसाठीच व्यतित केले असून, ती करतच रहाणार आहे. तसेच प्रदूषण मुक्तीसाठी सायकलनेच न थकता सर्व प्रवास करत असतो. सायकलवरील बॅगेतच सर्व साहित्य, पंक्चर काढण्यासाठी एअर पंप व बॅटरी हे सर्व बरोबर घेऊनच हे कार्य सुरु ठेवले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, लातूर, नगर, धुळे, कराड, चंद्रपूर, नागपूर येथेही कार्यक्रम केले आहेत. (वार्ताहर)सिबाप्रसाद दास यांना या अनोख्या सामाजिक उपक्रमासाठी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही शुभसंदेश दिला असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव ेदेशमुख व गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे ही त्यांच्या कार्यक्रमासाठी स्वत: आवर्जून उपस्थित राहत असत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठीही सहाय्य करत असत. चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनीही त्याचे स्वागत केले तसेच कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम पुढील दौऱ्यात आहे.