जिल्हा बँकेसाठी सातजणांची माघार

By Admin | Updated: April 23, 2015 00:53 IST2015-04-23T00:51:38+5:302015-04-23T00:53:58+5:30

गुरुवारी ‘गोकुळ’चे मतदान असल्याने फारशी माघारी होणार नाहीत.

Seven people for district bank withdrawal | जिल्हा बँकेसाठी सातजणांची माघार

जिल्हा बँकेसाठी सातजणांची माघार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी दाखल अर्जांपैकी केवळ सात जणांनी माघार घेतली आहे. माघारीसाठी अजून दोन दिवस असले तरी शेवटच्या दिवशी शुक्रवारीच (दि. २४) माघारीसाठी झुंबड उडणार आहे. जिल्हा बँकेसाठी ३९९ जणांनी विविध गटांतून अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जांच्या छाननीनंतर ३५३ अर्ज वैध ठरले. गेल्या बारा दिवसांत अवघ्या सात जणांनी माघार घेतली आहे. ‘गोकुळ’ व राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व यंत्रणा गुंतल्याने जिल्हा बँकेकडे फारसे कोणाचे लक्ष नाही पण माघारीचा दिवस जसा जवळ येईल, तशी नेत्यांची गडबड सुरू झाली आहे. किती पॅनेल होणार, ‘गोकुळ’मधील फॉर्म्युुला जिल्हा बँकेत कायम राहणार का? हे अजून अस्पष्ट आहे. गेले दोन दिवस पॅनेलच्या रचनेत नेतेमंडळी गुंग झाल्याने माघारीकडे कोणाचे लक्ष नाही. गुरुवारी ‘गोकुळ’चे मतदान असल्याने फारशी माघारी होणार नाहीत. पण तोपर्यंत पॅनेलचे चित्र स्पष्ट होणार असल्याने शुक्रवारी माघारीसाठी झुंबड उडणार आहे.

Web Title: Seven people for district bank withdrawal