शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:56 IST

एजंटसह दोघांना अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर/पन्हाळा : मुंबईत एका व्यावसायिकाची एक कोटी १० लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली असून, त्यातील सात लाख रुपये पन्हाळ्यातील आइसक्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबईतील वेस्ट सायबर पोलिसांनी पन्हाळ्यातील आइसक्रीम विक्रेता दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय ५२) आणि त्याला बँक खाते काढून देणारा एजंट चेतन मुकुंद पाडळकर (२९, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) या दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) रात्री उशिरा केली.मुंबई वेस्ट सायबर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन गच्चे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विमलकुमार गोयंका यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेतले. त्यानंतर शेअर बाजारात पैसे गुंतवून तिप्पट मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी वेळोवेळी ऑनलाइन एक कोटी दहा लाख रुपये घेतले होते.त्यानंतर ट्रेडिंग कंपनीच्या बनावट ॲपवर त्यांच्या खात्यात तिप्पट रक्कम जमा झाल्याचे भासवले. गोयंका यांनी खात्यातून तीन लाख रुपये काढून पैसे जमा झाल्याची खात्री केली. त्यानंतर काही दिवसांत त्यांचे अकाउंट ब्लॉक झाले. खात्यातील रक्कम काढल्यास कर भरावा लागेल, अशी भीती त्यांना घातली गेली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली.फिर्यादी गोयंका यांना आलेले मोबाइल नंबर बंद होते. गोयंका यांनी गुंतवणुकीसाठी रक्कम पाठविलेल्या बँक खात्यांची माहिती घेतली असता पोलिसांना त्यात पन्हाळ्यातील काझी बंधूंचे खाते मिळाले. त्यावरून तपास अधिकारी गच्चे यांनी बुधवारी सायंकाळी पन्हाळ्यात पोहोचून दस्तगीर काझी आणि इस्माईल काझी यांना ताब्यात घेतले. फसवणुकीतील सात लाख रुपये जमा झालेले बँक खाते दस्तगीर याचे असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. तसेच इस्माईल याला नोटीस देऊन सोडले.एजंटही सापडलादस्तगीर काझी याच्या चौकशीतून बँक खाते काढून देणाऱ्या एजंटचेही नाव समोर आले. पोलिसांनी तातडीने बापट कॅम्प येथील एजंट चेतन पाडळकर याला अटक केली. त्याने आणखी काही जणांना बँक खाती काढून दिली आहेत. या सर्व बँक खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गच्चे यांनी दिली.

कंबोडिया, मॅनमारमध्ये धागेदोरेऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट मोठे असून, त्याचे धागेदोरे कंबोडिया, मॅनमारपर्यंत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. रॅकेटमधील एकूण ४० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात देश-विदेशातील संशयितांचा समावेश आहे. फसवणुकीच्या रकमा वर्ग करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील व्यावसायिकाला गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून झालेल्या फसवणुकीचा तपास कोल्हापूरपर्यंत पोहोचला आहे. दोघांना अटक झाली असून, आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. - नितीन गच्चे - सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई वेस्ट सायबर पोलिस ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Crorepati cyber fraud, ₹7 lakh in ice cream seller's account.

Web Summary : Mumbai businessman lost ₹1.1 crore in online fraud. ₹7 lakh landed in a Kolhapur ice cream vendor's account. Police arrested vendor Dastgir Kazi and agent Chetan Padalkar. The investigation continues into other potential accounts involved.